फणसाच्या आठळ्यांचे आरोग्यदायी फायदे (Benefits O...

फणसाच्या आठळ्यांचे आरोग्यदायी फायदे (Benefits Of Jackfruit Seeds)

फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बिया म्हणजेच आठळ्या अनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकीच आठळ्यांमध्येही मुबलक पोषकतत्वे असतात.
डॉक्टर्स किंवा आहारतज्ज्ञ आपल्याला निरोगी राहण्यासाठी मौसमी फळं खाण्यास सांगतात. कारण त्या त्या मौसमातील फळांचा आपल्या शरीरास उत्तम फायदा होतो. आता उन्हाळा म्हटला की आंबे, फणस, करवंद… अशा तोंडात पाणी आणणार्‍या फळांचा मौसम असतो. उन्हाळ्यात आंब्यासोबतच फणसही मुबलक उपलब्ध असतो. अर्थात शहरातल्या माणसांना फणस फारसा मिळत नाही आणि त्यामुळे तो कसा खायचा हे देखील काहींना माहीत नसतं. फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बिया म्हणजेच आठळ्या अनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकीच आठळ्यांमध्येही मुबलक पोषकतत्वे असतात. नुसत्याच वाफवून किंवा भाजून खाल्ल्या तरी आठळ्या चविष्ट लागतात.

फणसाइतकेच आठळ्या खाण्याचेही फायदे
आठळ्यांमध्ये उत्तम प्रकारचे स्टार्च असते. यामधून शरीराला ऊर्जा मिळते. पोट भरण्यासाठी वाटीभर वाफवलेल्या आठळ्या खाणंही पुरेसं आहे.
आठळ्यांमध्ये चांगल्या दर्जाचे डाएटरी फायबर्स असतात. तसेच आठळ्यांत कॅलरीज कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करणार्‍यांसाठी नाश्त्याचा हा उत्तम
पर्याय आहे.
रक्तातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी संतुलित राखण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास आठळ्यांची मदत होते.
आठळ्यांमधून मॅन्गनीज्, मॅग्नेशियम यासारखी खनिजे मिळतात. या दोन्ही प्रकारच्या खनिजांमुळे हाडांना बळकटी मिळते. मॅग्नेशियङ्गुळे नर्व्हस सिस्टीमचे कार्य सुधारते. तर मॅन्गनीज् रक्ताचे क्लोटींग सुधारायला मदत करते.
आठळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायटोन्युट्रीएंट्स आढळतात. यामुळे एजिंग, रक्तदाब यांसारखे त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये अ‍ॅमन्टीऑक्सिडेटीव्ह गुणधर्मदेखील आढळतात.

आठळ्या कशा खाव्यात?
आठळ्या कशा खाव्यात, हे सांगण्याची खरं तर गरज नाही. तरीही आठळ्यांचे एवढे फायदे सांगितल्यानंतर नव्याने जर कोणी खाणार असेल तर त्यांना हे कळावे इतकेच.
सगळ्यात आधी फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यामधील बिया म्हणजेच आठळ्या पाण्यात भिजवून स्वच्छ धुवा. त्यावरील चिकट स्तर काढा. मग पाण्यात चिमूटभर मीठ घालून आठळ्या वाफवा. वाफवलेल्या आठळ्यांवरील चॉकलेटी रंगाचे आवरण काढा. अशाप्रकारे वाफवलेल्या आठळ्यांची भाजी करता येऊ शकते किंवा कोलंबी, जवळा अशा मांसाहारी पदार्थांमध्ये आठळ्या घालून त्या पदार्थांची लज्जतही वाढवता येऊ शकते.