गजक खाण्याचे मोठे फायदे (Benefits Of Gajhak)

गजक खाण्याचे मोठे फायदे (Benefits Of Gajhak)


आपल्याकडे थंडीच्या दिवसांत तिळाचं महत्त्व सांगितलं आहे. संक्रांतीच्या निमित्तानं तीळगूळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीनं खातोच. तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्यासाठीच ते पूर्वापार आपल्या आहारात घ्यायला सांगितले असावेत. गजक (Benefits Of Gajhak) हा देखील यापैकीच एक पदार्थ जो हिवाळ्यात खाल्ला जातो. गजक हा पदार्थ तीळ आणि गूळ यांनी बनविलेल्या चिकीसारखा पदार्थ असतो. गजकाचे सेवन केल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊया याचे फायदे-
गुळात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे गुळापासून बनवण्यात आलेले हे गजक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
गूळ तुमच्या शरीराला स्वच्छ करण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमच्या त्वचेलाही चमक येते. हिवाळ्यात दररोज दिवसातून एकदा जेवणानंतर 20 ग्रॅम गूळ असलेले गजक खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात.
गजकामुळे सांधेदुखीसारख्या आजारांनाही प्रतिबंध होतो. याचे कारण म्हणजे त्यात तीळ आणि शेंगदाणे पुरेशा प्रमाणात असतात.


गजकामध्ये तीळ असतात, जे रक्तदाब सामान्य करतात आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर करतात.
गजकातील तीळ, शेंगदाणे आणि गूळ यकृत निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात.
फायबरने भरपूर असलेले गजक पोटातील अस्वस्थता दूर करते.
गजकामध्ये झिंक, सेलेनियम सारखी खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास तसेच वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात.
गजक हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीरात लोह तयार होते. याच्या सेवनाने अशक्तपणाचा आजारही दूर होतो.
गजकामध्ये असलेले तीळ, शेंगदाणे, सुका मेवा, वेलची इत्यादी थंड वातावरणात शरीराला
उबदार ठेवतात.
तीळ आणि गूळ शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-पडसासारख्या आजारांपासून शरीराचे रक्षण करतात.
गजक खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो, शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा वाढते.