गवार – सगळ्यांनी खा आणि निरोगी राहा (Bene...

गवार – सगळ्यांनी खा आणि निरोगी राहा (Benefits of Cluster Beans)

गवार म्हटलं की लहान मूलं तर सोडाच पण काही मोठ्या व्यक्तीदेखील नाकं मुरडतात. ज्या घरातील गृहिणीला ही भाजी आवडत नाही. ती घरात गवार आणत नाही. त्यामुळे मुलांना ती माहीतही होत नाही. पण लहानपणापासून आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्ती आपल्याला वारंवार आपण सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजेत असे सांगत असतात, त्यामागे तसंच कारण असतं. काही भाज्या आपल्या आवडत्या असतात तर काही भाज्या आपल्याला आवडत नसतात. मात्र प्रत्येक भाजी खाण्यामागे त्याचे काही फायदे हे निश्चितच आपल्या शरीराला होत असतात. गवार ही त्यापैकीच एक भाजी आहे जी अगदी सहजपणे उपलब्ध होते आणि आपल्याला अनेक फायदे करून देते. आज आपण गवारच्या भाजीचे आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात हे जाणून घेऊया.

gavarichi bhaji

* गवारीची भाजी अगदी सहजपणे उपलब्ध होणारी व विदेशी भाज्यांपेक्षा स्वस्त असणारी औषधी गुणधर्मांनी भरपूर अशी भाजी आहे. या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, सोल्युबल फाइबर आणि अ, क, के जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. ही सर्व पोषक मूल्यं आपल्या शरीराला गवारीच्या भाजीच्या सेवनामुळे मिळतात.

* गवारची भाजी ही मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी जणूकाही वरदान असते. यामध्ये असलेल्या ग्लायइको न्यूट्रिअन्ट या घटकामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळते.

* गवारच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस हे घटक असतात. यात हाडांच्या व स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले घटकही असतात. त्यामुळे गवारच्या भाजीचे सेवन केल्याने आपल्या हाडांची झीज होत नाही.

* हृदयाशी निगडित निरनिराळ्या विकारांना टाळण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी गवारची भाजी अवश्य खावी, असे सांगितले जाते. कारण यामध्ये शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते.

* गवारच्या भाजीमध्ये फॉलिक अ‍ॅसिड आणि लोह मुबलक प्रमाणात असते. ही भाजी गर्भवती महिलांनी अवश्य खावी. कारण या भाजीमुळे गर्भवती महिलांसोबतच गर्भालासुद्धा लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचा पुरवठा होतो.

* गवारच्या भाजीमध्ये असलेल्या जीवनसत्वांमुळे त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. * गवारची भाजी हे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी साहाय्य करते.
* दमा असलेल्या व्यक्तींनी गवार उकळून बनवलेले पाणी पिणे अतिशय परिणामकारक ठरते असा अनुभव आहे.