कतरीना आणि विकी यांच्या लग्नाच्या फोटोंची विक्र...

कतरीना आणि विकी यांच्या लग्नाच्या फोटोंची विक्री जोरात : या आधी आपल्या लग्नाचे फोटो करोडो रुपयात विकलेले स्टार्स (Before Vicky And Katrina, These Stars Have Also Sold Their Wedding Pics : Deal Done In Crores)

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी आपलं लग्न राजस्थानातील एका हॉटेलात थाटामाटात केलं होतं. प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी या सोहळ्यात येऊ दिलं नाही. कारण काही वर्षांपासून बॉलिवूडच्या स्टार्सनी एक नवा पायंडा पडला आहे. म्हणजे आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओज प्रसिद्धी माध्यमांना विकायचे व खूप पैसे कमवायचे. हेच काम कतरिना – विकीने केलं.

कतरीना कैफ – विकी कौशल : या स्टार कपलने  आपला लग्नसोहळा, हळदीचा कार्यक्रम आणि मेंदी – संगीताची घटना इत्यादींचे फोटो आणि व्हिडीओज ओटीटी मंच आणि एका परदेसी मासिकाला विकले. असं ऐकिवात आहे की, यातून त्यांना जवळपास १०० कोटी रुपयांची कमाई झाली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दीपिका पदुकोण  – रणवीर सिंह : आजच्या काळातील सर्वात सुंदर जोडपं, अशी प्रसिध्दी पावलेल्या या स्टार्सनी २०१८ साली इटलीत लग्न केलं. त्यांनी प्रसिध्दी  माध्यमांना दूर ठेवलं , आणि आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो व व्हिडीओज करोडो रुपयात विकले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
अनुष्का शर्मा – विराट कोहली : या दोघांनी २०१७ साली गुपचुपपणे इटलीत जाऊन शुभमंगल उरकलं. त्यांनी तिथे फारच कमी लोकांना आमंत्रित केलं होतं. हाती आलेल्या वृत्तानुसार या जोडप्याने आपल्या लग्नसमारंभाचे फोटो एका मासिकाला विकले. मात्र या व्यवहारात मिळालेले करोडो रुपये त्यांनी दान केले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
प्रियांका चोप्रा – निक जोनास : २०१८ साली या दोघांनी राजस्थानात आपलं लग्न थाटामाटात केलं खरं, पण या सर्व सोहळ्यांना त्यांनी खासगी ठेवलं होत. यांच्या लग्नात मोबाईल् वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. हाती आलेल्या वृत्तानुसार प्रियांका – निक यांनी आपल्या लग्नाचे फोटो १८ कोटी रुपयांना विकले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम