भगव्या बिकिनी पूर्वी ब्रा वाल्या सीनमुळे सुद्धा...

भगव्या बिकिनी पूर्वी ब्रा वाल्या सीनमुळे सुद्धा वादात सापडली होती अभिनेत्री दीपिका पादुकोण पूर्वी(Before Saffron Bikini, Deepika Padukone has Been Embroiled in Controversy Regarding Bra Scene, Know the Whole Story)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोबत तीन सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यावर, अभिनेत्री दीपिका पादुकोण आता त्याच्यासोबत पठाण या चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होईल. तसे पाहायला गेल्यास हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत होता. या चित्रपटातील दीपिकाची भगवी बिकिनी आणि बेशरम रंग हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वादात अडकण्याची दीपिकाची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही ती ब्रामुळे वादाचा सापडली होती.

शाहरुख आणि दीपिका चा पठाण हा चित्रपट जेव्हा सेन्सर बोर्ड कडे सर्टिफिकेट साठी केला तेव्हा त्यात 12 छोटे कट्स करून त्यास युए सर्टिफिकेटने पास केले गेले. याआधीही दीपिकाच्या एका चित्रपटातील ब्रा वाल्या सीन वर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली होती. हा किस्सा फाइंडिंग फैनी या चित्रपटाशी निगडित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक होमी अदजानिया च्या ‘फाइंडिंग फैनी’ या चित्रपटावरही सेन्सॉर बोलणे काटछाट केली होती. या चित्रपटातील काही सीन मुळे सुद्धा खूप गोंधळ निर्माण झाला होता तेव्हा चित्रपटाला जर यु ए सर्टिफिकेट हवे असल्यास त्यातील काही सीन कट करावे लागतील असे सेन्सॉर बोर्डाने सांगितले होते.

या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या ‘आय अॅम व्हर्जिन’ या डायलॉगवरूनही बराच वाद झाला होता. सेन्सॉर बोर्डाने व्हर्जिन हा शब्द बदलण्याची सूचना केली, पण नंतर तो संवाद मंजूर झाला. याशिवाय बोर्डाने चित्रपटात दीपिकाच्या ब्राचा सीन कट करण्यास सांगितला होता, त्यानंतर हा सीन छोटा करून ब्लर दाखवण्यात आला होता.

इतकंच नाही तर ‘फाइंडिंग फॅनी’च्या एका सीनमध्ये पंकज कपूर डिंपल कपाडियाच्या नितंबाकडे टक लावून पाहत आहेत असे दाखवण्यात आले होते. या सीनवर आक्षेप घेत सेन्सॉरने तो लहान करण्याची सूचना दिली होती. या चित्रपटातही अनेक कट करण्यात आले, त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, ‘पठाण’बद्दल बोलायचे झाल्यास तो वादग्रस्त असूनही चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.