कपिल शर्मासोबत लग्न लावून देण्यास गिन्नी चतरथच्...

कपिल शर्मासोबत लग्न लावून देण्यास गिन्नी चतरथच्या वडिलांनी दिला होता नकार (Because of This Kapil Sharma was Rejected by Ginni Chatrath’s Father, Know How Couple Got Married)

टीव्हीचा कॉमेडी किंग कपिल शर्मा आपला लाफ्टर शो ‘द कपिल शर्मा शो’मधून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिलचे गिन्नी चतरथसोबत लव्ह मॅरेज झाले आहे. त्यांना दोन मुलंही आहेत. कपिल अनेकदा शोमध्ये आपल्या पत्नीबद्दल बोलतो, पण गिनी चतरथशी लग्न करणे कपिल शर्मासाठी अजिबात सोपे नव्हते. जेव्हा त्याने गिन्नीच्या वडिलांकडे तिचा हात मागितला तेव्हा त्यांनी कपिलला नकार दिला होता. कारण तेव्हा कपिलची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती तसेच दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते, पण नात्यात येणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देत अखेर दोघांनी लग्न केले.

कपिलने स्वतः सांगितले होते की गिन्नीच्या वडिलांनी त्याला नाकारले होते, त्यानंतर अनेक अडचणींसह त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले. काही वर्षांपूर्वी कपिलने एका मुलाखतीत सांगितले होते की, गिन्नीशी लग्न करण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले होते.

कपिल शर्माने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून कॉमेडी जगतात करीअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये येण्यापूर्वीही त्याने अनेक शो केले असले तरी खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळाली ती या शोमधून. असे म्हटले जाते की ज्या काळात कपिल आपल्या करीअरसाठी संघर्ष करत होता, त्या काळात गिन्नीचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या त्याच्यापेक्षा अधिक संपन्न होते, तर कपिलची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. कपिलची आर्थिक परिस्थिती हा त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा होता.

या विषयावर बोलताना कपिलने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला अनेकदा असे वाटत होते की गिन्नीसोबतच्या माझ्या नात्याला भविष्य नाही. याशिवाय दोघांचे वेगवेगळ्या जातीचे असणे ही देखील मोठी समस्या होती. या सगळ्याचा विचार करून मी गिन्नीसोबत ब्रेकअप केला, पण गिन्नीने कधीच धीर सोडला नाही. जेव्हा मी थोडे चांगले कमवू लागलो, तेव्हा माझी आई लग्नाचा प्रस्ताव घेऊन गिन्नीच्या घरी गेली, पण तिच्या वडिलांनी तो प्रस्ताव नाकारला.

कपिलने पुढे सांगितले की, ज्या काळात मी मुंबईत स्थायिक होण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत होता, परंतु या कठीण परिस्थितीत गिन्नीने कधीच माझी साथ सोडली नाही. शेवटी, टीव्हीवर नाव कमावल्यानंतर, 2016 मध्ये मी गिन्नीला फोन केला आणि सांगितले की मला तिच्याशी लग्न करायचे आहे, त्यानंतर गिन्नीने तिच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी तिच्या वडिलांनी होकार दिला.

अखेर अनेक अडचणींनंतर दोघांनी १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. लग्नाच्या एक वर्षानंतर, त्यांची मुलगी अनायरा जन्माला आली आणि त्यानंतर 2021 मध्ये या त्यांच्या मुलाचा जन्म झाला. आता दोघेही आपले वैवाहिक जीवन खूप एन्जॉय करत आहेत.