जॉन अब्राहम आणि बिपाशा बसूच्या 9 वर्षांच्या नात...

जॉन अब्राहम आणि बिपाशा बसूच्या 9 वर्षांच्या नात्याला या कारणामुळे गेला होता तडा (Because Of This, John And Bipasha Basu’s Relationship Of 9 Years Was Broken In A Moment)

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम 50 वर्षांचा झाला असला तरी आजही त्याचे व्यक्तिमत्त्व तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण करते. आजही त्याने स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवले आहे. मॉडेलिंगपासून आपल्या करीअरची सुरुवात करणाऱ्या जॉन अब्राहमने 2003 मध्ये ‘जिस्म’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेत्री बिपासा बसू मुख्य भूमिकेत होती. दोघांची जोडी लोकांना खूप आवडली. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि ते प्रेमात पडले. दोघांच्या या अफेअरमुळे बऱ्याच चर्चा झाल्या.

‘जिस्म’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमाची ही सुरुवात झाली होती, दोघांनीही मीडियासमोर उघडपणे एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. सर्व प्रकारच्या पार्टी फंक्शनमध्ये दोघेही एकत्र दिसत होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले.

बिपाशा बसू आणि जॉन अब्राहमची जोडी बॉलिवूडची सर्वात हॉट जोडी म्हणून ओळखली जात होती. पण 2014 मध्ये या दोघांचे ब्रेकअप ही बातमी समोर आली आणि सगळ्यांना धक्का बसला. दोघांचे नऊ वर्षांचे नाते केवळ एका ट्विटमुळे तुटले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमच्या एका ट्विटने बिपाशा बसूचे मन दुखावले गेले. 2014 मध्ये जॉन अब्राहमने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याने प्रिया रुंचालच्या नावाचा उल्लेख केला होता. जेव्हा बिपाशाला जॉन आणि प्रियाच्या नात्याबद्दल कळले तेव्हा तिचे मन खूप दुखावले होते. याच कारणामुळे बिपाशाचे जॉनसोबत ब्रेकअप झाले. विशेष म्हणजे 2014 मध्येच जॉन अब्राहमने प्रियाशी लग्न केले होते.