जेठालाल उर्फ दिलीप जोशी अभिनय क्षेत्राला करणार ...

जेठालाल उर्फ दिलीप जोशी अभिनय क्षेत्राला करणार होते रामराम पण अचानक नशीब चमकले (Because of This Jethalal Wanted to Say Goodbye to Acting, Know-How His Luck Shines)

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ 2008 पासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांकडून सुध्दा या मालिकेला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेत जेठालाल ते बबिता अशा एकापेक्षा एक व्यक्तिरेखा आहेत. यात दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत आहेत, तर अमित भट्ट बापूजींच्या भूमिकेत दिसत आहेत,मुनमुन दत्ताने बबिता जीची भूमिका साकारली आहे.

वर्षानुवर्षे चालणाऱ्या या टीव्ही मालिकेने अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक कलाकारांनी या मालिकेला निरोपही दिला, तर अनेक नवीन कलाकार त्यात सहभागी झाले.गेली काही वर्षे मालिकेतील सर्वांचे आवडते पात्र दयाबेन दिसत नसली तरीही चाहते मात्र तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. दिलीप जोशी यांना जेठालाल या व्यक्तिरेखेने खूप प्रसिद्धी मिळवून दिली यात शंका नाही, पण एक वेळ अशी होती की त्यांनी अभिनय क्षेत्र कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला होता.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका साकारण्यापूर्वी दिलीप जोशी अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत दिसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक काळ असा होता जेव्हा दिलीप जोशी ग्लॅमर जगताला निरोप देण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांना ‘तारक मेहता….’ मालिकेची ऑफर मिळाली नव्हती.

दिलीप जोशींना ‘तारक मेहता…’ मालिकेची ऑफर मिळण्यापूर्वी ते दुसऱ्या कोणत्यातरी मालिकेत काम करत होते, पण ती मालिका अचानक बंद झाली. मालिका बंद झाल्यानंतर दिलीप जोशी जवळपास एक वर्ष कामाच्या शोधात होते, पण काम नसल्यामुळे वर्षभर ते बेरोजगार राहिले. बेरोजगारीमुळे ते इतके अस्वस्थ झाले की त्यांनी अभिनय जगताला निरोप देण्याचे ठरवले होते, पण नंतर त्यांच्या नशिबाने असे काही वळण घेतले की बघता बघता सगळेच बदलले.

2008 मध्ये जेव्हा दिलीप जोशींना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची ऑफर आली तेव्हा त्यांचे आयुष्य बदलले. त्यांनी जेठालालची भूमिका साकारून लोकांची मने जिंकली, प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर बसवले, तेव्हापासून दिलीप जोशी जेठालाल बनून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आज दिलीप जोशी त्यांच्या पात्रासाठी भरमसाठ फी घेतात. मिळालेल्या माहितीनुसार, ते एका एपिसोडसाठी सुमारे 1.5 लाख रुपये घेतात. दिलीप जोशी आज 40 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.