अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत लग्न करण्यास तयार ...

अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत लग्न करण्यास तयार नाही, अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा (Because of This, Arjun Kapoor is Not Ready to Marry With Malaika Arora, Actor Himself Revealed)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या प्रेमी युगुलांबद्दल आपण जाणतोच की या दोघांचं एकमेकांवर अतीव प्रेम आहे. दोघांनी आपल्यातील प्रेम जगजाहिर केलेलं आहे. इतकेच नाही तर बॉलीवूडचे हे लव्हबर्डस्‌ वेळोवेळी सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत, त्यांचे चाहते या जोडप्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु आता अशी काही बातमी समोर येत आहे की ती जाणून घेतल्यानंतर चाहते थोडे निराश होऊ शकतात. वास्तविक, अर्जुन कपूरने अलीकडेच खुलासा केला आहे की तो त्याची प्रेयसी मलायका अरोरासोबत सात फेरे घेण्यास तयार नाही आणि अभिनेत्याने याचे कारणही दिले आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

वास्तविक, अर्जुन कपूर नुकताच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शो मध्ये त्याची बहीण सोनम कपूरसोबत गेला होता. जोहरचा ‘कॉफी विथ करण 7’ शो सध्या सेक्स लाईफवरील त्याच्या प्रश्नांमुळे खूपच चर्चेत आला आहे. शो मध्ये सेलिब्रिटींच्या आयुष्यातील मोठे खुलासे आपल्याला हैराण करुन सोडत आहेत. याच शो मध्ये अर्जुनने आपण मलायका अरोरासोबत लग्न करण्यास तयार नसल्याचे उघड केले. करणने त्याला विचारले होते की, तो मलायकासोबत लवकरच लग्न करणार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात त्याने मलायकासोबत लग्न करण्यास तयार नसल्याचे कारण सांगितले.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

अर्जुन कपूरने करणच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, खरे सांगायचे तर मी सध्या मलायकासोबत लग्न करण्यास तयार नाही, कारण कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊनमुळे दोन वर्षांत बरेच काही घडले आहे. अभिनेत्याने सांगितले की त्याला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तो म्हणाला की मी वास्तववादी माणूस आहे. मी लाजाळू नाही आणि मला काहीही लपविण्याची गरज नाही.

करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला आहे की, ”मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसंच, मला माझ्या आयुष्यात स्थिर व्हायचं आहे, व्यावसायिक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवरही. मला आयुष्यात काम करत राहायचं आहे, कारण त्यामुळे मला आंतरिक आनंद मिळेल आणि मी माझ्या जोडीदाराला पण खूश ठेवू शकेन”

करणच्या शोमध्ये अर्जुनने सांगितले की, मलायका त्याच्या आजीलाही भेटली आहे. मलायकाचा आधीचा पती अरबाज खानच्या कुटुंबाप्रती आपण संवेदनशील राहिले पाहिजे, असे तिने सांगितले. आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत, पण व्यावसायिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतरच मी लग्नाचा विचार करू शकेन.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी २०१९ मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. अर्जुन मलायका अरोरापेक्षा फक्त १२ वर्षांनी लहान आहे आणि दोघंही ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी मलायका ही सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती आणि दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव अरहान आहे.

विशेष म्हणजे, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून दोघेही एकत्र व्हेकेशन एन्जॉय करतात, पण आता अर्जुन कपूरच्या या वक्तव्यामुळे या जोडप्याच्या लग्नासाठी चाहत्यांना अजून वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम