या पाच कारणांमुळे ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्...

या पाच कारणांमुळे ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे (Because Of These 5 Reasons, The Boycott Of The Film ‘Brahmastra’ Is Happening, You Will Be Stunned To Know)

सध्या बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोरदार सुरु आहे. एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहे. एखादा चित्रपट भविष्यात सुपरहिट होईल असा दावा ज्योतिषांकडून केला गेला तरी मायबाप प्रेक्षकांपुढे त्यांचे भाकीत देखील खोटे ठरत आहे. सध्या अनेक मोठ्या कलाकारांनी केलेल्या जुन्या विधानांमुळे त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकून बदला घेतला जात आहे. बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लोकांच्या निशाण्यावर आहे. या मागची 5 कारणे समोर आली आहेत.

 या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे लोक बॉलिवूडवरच बहिष्कार घालत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी बॉलिवूडवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार ते हा देखील चित्रपट पाहणार नाहीत.

दुसरे कारण म्हणजे या चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट. बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या वाढत्या मागणीवर आलियाने रागात म्हटले होते की, ‘तुम्हाला माझे चित्रपट आवडत नसतील तर ते पाहू नका.’ त्यामुळे हा चित्रपट न पाहता आलियाचा माज उतरवण्याची भाषा यूजर्स करत आहेत.

तिसऱ्या कारणात या चित्रपटात हिंदू धर्माचा अनादर केल्याचे  म्हटले जात आहे. आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि रणबीर यांनी चित्रपटात हिंदू धर्माचा अपमान केल्याचे अनेक यूजर्सचे मत आहे. त्यामुऴे या चित्रपटावर बहिष्कार टाकून त्याचा बदला घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

चौथे कारण म्हणजे बॉलिवूड कलाकारांच्या मनात देवाबद्दल खोटी भावना असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर एका यूजरने म्हटले की, बॉलिवूड कलाकारही राजकारण्यांसारखे असतात. जसे निवडणुकीपूर्वी राजकारणी मंदिर ते मशिदीत जाऊन प्रचार करतात, त्याचप्रमाणे प्रत्येक चित्रपटापूर्वी कलाकार मंडळीही मंदिरात आणि इतर ठिकाणी जाऊन आपला प्रचार करतात.

पाचवे कारण म्हणजे आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्ट. काही काळापूर्वी राहुल भट्टने २६/११ हल्ल्यातील आरोपी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यावर ट्रोलर्स म्हणाले की, हे कुटुंब अशा आरोपींसाठी खास आहे, त्यामुळे सगळ्यांनी ‘ब्रह्मास्त्र’वर बहिष्कार टाकावा.