विकी कौशलने शेअर केला लग्नातला मजेदार किस्सा(Be...

विकी कौशलने शेअर केला लग्नातला मजेदार किस्सा(Because Of Katrina, Vicky Did Not Have To Pay Money To Hide Shoes In Marriage, The Actor Told An Interesting Story)

बॉलिवूडचे पॉवर कपल कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी अगदी थाटात लग्न केले होते. अलीकडेच या जोडप्याने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. आजही कतरीना  आणि विकी लग्नाच्या विधींशी संबंधित किस्से मित्र आणि चाहत्यांशी शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी विकी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता तेव्हा त्याने लग्नाशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा शेअर केला. अभिनेत्याने सांगितले की कतरीनामुळे त्याला लग्नात बूट लपविण्याच्या विधींना पैसे द्यावे लागले नव्हते.

लग्नांमध्ये बूट लपवण्याचा विधी खूप लोकप्रिय आणि मनोरंजक असतो. विकी आणि कतरीनाच्या लग्नातही असंच काहीसं घडलं होतं. अभिनेत्रीच्या बहिणी आणि मित्रांनी मिळून विकीचा बूट चोरले होते. पण कतरीनामुळे विकीला एक पैसाही द्यावा लागला नाही शिवाय त्याला कोणताही त्रास न होता आपले बूट परत मिळाले.

विकी कौशल आपल्या आगामी ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता. दरम्यान, कपिलने विकीला विचारले, “कतरीनाला सहा बहिणी आहेत, त्यामुळे त्यांनी बूट लपवण्याच्या विधीसाठी खूप पैसे घेतले असतील?” तर कपिलच्या या प्रश्नाला उत्तर देताना विकी म्हणाला, “माझ्यासोबत लुधियानाचे माझे दोन भाऊ होते, त्यांनी मला काळजी नको करुन, आम्ही बघतो असे म्हटले होते. पण मी लग्नाच्या फेऱ्यांसाठी मंडपात पोहोचताच कतरीनाच्या बहिणी तिथे आल्या आणि माझे बूट ओढू लागल्या. त्याचवेळी माझे भाऊसुद्धा त्यांच्याशी बूट न देण्यावरुन वाद घालू लागले. पण मी त्यांना म्हणालो, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. त्यानंतर त्यांनी शूज कुठेतरी लपवले.

विकी पुढे म्हणाला, “आमचे फेरे संपताच कतरीनाला सूर्यास्तापूर्वी फोटो काढायचे होते. पण तेव्हा सूर्य मावळत होता आणि माझ्याकडे बूट नव्हते. त्यावेळी कतरीनाने सर्वांना खडसावत म्हटले, ‘त्याचे बूट कुठे आहे?’ माझ्या भावांना शूज कुठे आहेत हे माहित नव्हते, त्यामुळे कतरीनाने आपल्या बहिणींना शूज आणण्यास सांगितले. तिच्या बहिणींना शूज परत करण्यापूर्वी पैसे घ्यायचे होते, मात्र कतरीनाने त्यांना सांगितले, मला पैशांचे वगैरे काही माहित नाही त्याला आधी त्याचे शूज परत द्या. अशा प्रकारे माझे शूज मला मिळाले.”

9 डिसेंबर 2021 रोजी विकी कौशल आणि कतरीना कैफचे लग्न झाले. दोघांच्या लग्नाला एक वर्ष झाले असून दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.