आरोग्य व सौंदर्यवर्धक संत्रं (Beauty Booster An...

आरोग्य व सौंदर्यवर्धक संत्रं (Beauty Booster And Health Protector Orange)

संत्र्याचा गर आणि सालही आरोग्यासोबतच सौंदर्यवर्धनासाठी अतिशय उपयुक्त आहे.
सध्या मौसम आहे आंबट-गोड चवीच्या संत्र्यांचा. लिंबाच्या जातीतलं हे फळ अतिशय पौष्टिक आहे. यात अ, ब, क जीवनसत्त्वं आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत. संत्र्याचा गर आणि सालही आरोग्यासोबतच सौंदर्यवर्धनासाठी अतिशय उपयुक्त आहे.
– जेवणानंतर दोन संत्री नियमितपणे खाल्ल्यास पोट जड होणं, अपचन, पोटात वायू धरणं यासारख्या समस्या दूर होतात.
– एक कप संत्र्याच्या रसामध्ये चिमूटभर काळं मीठ आणि थोडी काळी मिरी पूड घालून प्यायल्यास, अजीर्णात तात्काळ आराम मिळतो.
– भूक लागत नसल्यास संत्रं खावं. संत्र्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होतो.
– संत्र्याच्या रसामुळे पोटातील कृमी, पोटशूळ कमी होतो.

– पोट दुखत असेल तर अर्धा ग्लास संत्र्याच्या रसामध्ये थोडा हिंग गरम करून घाला आणि हा रस प्या. लगेच परिणाम दिसून येईल.
– संत्र्याच्या रसामध्ये थोडं मीठ घालून रिकाम्या पोटी प्यायल्यास जुनी बद्धकोष्ठताही दूर होते.
– संत्रं हे अ‍ॅसिडिटीसाठी रामबाण औषध आहे. संत्र्याच्या रसामध्ये थोडं भाजलेलं जिरं आणि सैंधव मीठ घालून प्यायल्यास, आंबट ढेकर, छातीत जळजळ आदी अ‍ॅसिडिटीमुळे होणारे आजार दूर होतात.
– एक कप संत्र्याच्या रसामध्ये थोडा मध घालून प्यायल्यास गर्भवती स्त्रियांना होणारा उलटीचा त्रास आणि अस्वस्थता इत्यादी समस्या दूर होतात.
– संत्रं आणि द्राक्ष यांचा रस एकत्र करून कुपोषित बालकांना प्यायला दिल्यास फायदा होतो.
– एक-दोन कप संत्र्याचा रस दिवसातून तीन वेळा घेतल्यास शीतज्वरापासून (फ्ल्यू) आराम मिळतो.
– थंड हवामानात बदल होऊन उष्णता सुरू होताना बर्‍याच जणांना जुलाबाची समस्या सुरू होते. अशा वेळेस संत्र्याचा रस जास्तीत जास्त प्यावा.
– खाज, खरूज, फोड इत्यादी त्वचा विकारांमध्ये संत्र्याचं ताजं साल वाटून त्याचा लेप लावावा. लगेच परिणाम दिसून येतो.
– ताज्या संत्र्याची साल चेहर्‍यावर चोळल्यास, मुरुमं, वांग तसंच देवीचे डागही हळूहळू नाहीसे होतात.

– हात-पायाची त्वचा मुलायम होण्यासाठी, संत्र्याच्या सालीची पूड आणि मध एकत्र करून लावावं.
– केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई आणि संत्र्याची पूड एकत्र करून उकळवा. या मिश्रणाने नियमितपणे केस धुतल्यास केस तजेलदार आणि काळेभोर होतात.
– संत्र्यामुळे शरीराची झीज कमी होते आणि रक्त वृद्धी होते.
– हाडं मजबूत होतात. 

सौंदर्यवर्धक ज्यूस (Enhance Beauty With Juices)