कतरिनाने शेअर केले पती विकीसोबतचे व्हेकेशनचे रो...

कतरिनाने शेअर केले पती विकीसोबतचे व्हेकेशनचे रोमँटिक फोटो (Beach Vacation: Katrina Kaif Shares Romantic Pictures With Vicky Kaushal)

सध्या कॅट आणि विक्की हे बॉलिवूडमधील रोमँटिक कपल सुट्ट्यांवर गेले आहेत. दोघं कामातून फ्री होऊन एकमेकांसोबत काही रोमँटिक क्षणांचा अनुभव घेत आहेत. तिथले दोघांचे रोमँटिक फोटो कतरिनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहताक्षणीच व्हायरल झाले आहेत.

कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर विकीबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेणारे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी समुद्रकिनारी एका यॉटमध्ये बसलेले दिसत आहेत. एका फोटोमध्ये विकी कतरिनाच्या मांडीमध्ये डोकं ठेवून पहुडलेला दिसत आहे. एका फोटोमध्ये कतरिना शांतपणे बसून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये सूर्यास्त होताना दिसत आहे. हा फोटो अतिशय सुंदर आहे.

विक्की कौशलने देखील त्याच्या इन्स्टा स्टोरीवर कॅटचा टोपी घातलेला एक फोटो शेअर केला आहे आणि त्यावर त्याने हार्ट काढले आहे. त्याच वेळी, त्याने सुंदर नैसर्गिक दृष्यांनी परिपूर्ण असलेल्या लोकेशनचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

कतरिनानं हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्यावर भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘खूप सुंदर दिसत आहात…’ तर आणखी एका युझरनं लिहिलं आहे,’तुम्ही दोघं एकत्र क्युट दिसत आहात…’ तर अनेक युझर्सनी या फोटोंवर हार्टचा इमोजी कॉमेन्टमध्ये शेअर केले आहेत.

विकीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं तर तो लवकरच अश्वत्थामा, गोविंदा मेरा नाम या सिनेमांत दिसणार आहे. तर कतरिना टायगर ३, फोन भूतमध्ये दिसणार आहे. याशिवाय कतरिनाच्या Kay Beauty ब्रँडसाठी तिला बिझनेस आयकॉन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे.

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम