सावधान! तुम्ही आंधळे होऊ शकता …. वेळीच का...

सावधान! तुम्ही आंधळे होऊ शकता …. वेळीच काळजी घ्या!! (Be Careful : You May Become Blind If You Ignore Proper Treatment)

नुकताच जागतिक मधुमेह दिन साजरा झाला. त्या निमित्ताने धक्कादायक माहिती उजेडात आली. म्हणजे २० ते ६० या वयोगटातील दर ४ पैकी एका व्यक्तीला मधुमेह असतो. जगभरात जेवढया लोकांना अंधत्व येते, त्यामध्ये २-६% अंधत्व या मधुमेहामुळे येते. या मधुमेहाने डायबेटिक रेटिनोपथी सारखे डोळ्यांचे आजार होण्याची शकयता वाढते. अन कालांतराने तुम्ही कायमचे आंधळे होऊ शकता. ही  माहिती डॉ. अग्रवाल ग्रुप ऑफ आय हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ञ, डॉ. एस नटराजन यांनी दिली आहे.

यावर काय काय इलाज केले जातात, याबद्दल डॉक्टर म्हणतात, “ड्रॉप्स वापरून, डोळ्याची बाहुली विस्फारून आणि रेटिनाची चाचणी करून डायबेटिक रेटिनोपथीची वैद्यकीय चाचणी केली जाते. मधुमेहामुळे इजा झालेल्या रक्तवाहिन्यांवर लेझरने उपचार केले जातात. रेटिनाला सूज आल्याचे आढळले तर सूज उतरेपर्यंत दर महिन्याला विशिष्ठ इंजेक्शन दिली जातात. जर हा आजार गंभीर झाला असेल तर शस्त्रक्रिया केली जाते.”

“सकस आहार, नियमित व्यायाम, वेळेवर औषधे घेणे, ब्लड शुगर वर लक्ष ठेवणे आणि कोलेस्ट्रॉल  व उच्च रक्तदाबावर काटेकोर नियंत्रण ठेवणे, यामुळे रेटिनोपथी विकसित होण्याची शक्यता कमी करता येते. अजून एक काळजी म्हणजे दर ६ महिन्यांनी आपले डोळे नियमितपणे तपासून घ्यावेत. रेटिनोपथीचे वेळीच निदान झाले तर आंधळेपणा येणार नाही”. असा आपुलकीचा सल्ला डॉ. नटराजन यांनी दिला आहे.