आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित (BCCI Suspends IP...

आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित (BCCI Suspends IPL After Several Players Test Positive For Covid-19)

करोनाच्या वाढत्या संसर्गाने लोकांचे जिणे हराम करून सोडले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. कित्येक क्रिकेटपटूंना या रोगाचा संसर्ग झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, दिल्लीचा अमित मिश्री, चेन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी आणि हैदराबादचा बुद्धीमान साहा यांना करोनाने गाठले आहे. त्यामुळे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या स्पर्धा स्थगित केल्या आहेत.

आज सकाळी या संदर्भात झालेल्या तातडीच्या बैठकीत हा कठोर निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयने निवेदन दिलं आहे की, लिगमध्ये भाग घेणारे क्रिकेटपटू तसेच अन्य सदस्य व सहयोगी कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत जोखीम घेता येणार नाही. सर्व संबंधितांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आणि आता सर्व खेळाडू व संबंधित कर्मचारी यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यासाठी बोर्ड सर्वतोपरी काळजी घेईल.

या आधी क्रिकेटवीर आर. अश्विन याने आपल्या करोनाग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यासाठी ही स्पर्धा सोडली होती.

सदर क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने दिवसेंदिवस रंगतदार होणाऱ्या सामन्यांना क्रिकेट शौकीन मुकणार आहेत.