‘माझा आवाज बसला ही निखालस खोटी बातमी…’ गायक – स...

‘माझा आवाज बसला ही निखालस खोटी बातमी…’ गायक – संगीतकार बप्पी लाहिरी यांचा संताप (Bappi Lahiri Denies Reports Losing His Voice)

ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांनी त्यांचा आवाज गमावल्याचे खोटे वृत्त अलीकडे सोशल मीडियावर प्रसारीत होत होते. याबाबत बप्पीजींना कळल्यानंतर त्यांनी या खोट्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

Bappi Lahiri, Losing His Voice

बप्पी लाहिरी यांनी आपला आवाज बसला ही निकालस खोटी बातमी असल्याचे सांगून त्याबाबत संताप व्यक्त करत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे, त्यात त्यांनी लिहिलंय, ‘काही प्रसार माध्यमांनी माझ्या आरोग्याबद्दल चुकीच्या बातम्या दिल्याने मला वाईट वाटले आहे.’  ते पुढे असंही म्हणाले की, ‘माझे चाहते आणि हितचिंतकांच्या आशीर्वादाने मी व्यवस्थित आहे.’

Bappi Lahiri, Losing His Voice

एप्रिलमध्ये बप्पी लाहिरी यांना करोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु, लवकरच ते बरे होऊन आले होते. तथापि अजूनही त्यांना अधूनमधून आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचे कळते.
अहवालांनुसार, बप्पीदांना व्हीलचेअरमध्ये पाहिल्यानंतर तसेच त्यांच्या जुहू बंगल्यामध्ये त्यांना सहजपणे फिरण्यासाठी लिफ्ट बसवण्यात आल्याचे समजल्यामुळे सगळा घोळ झाला. तसेच तेथे त्यांना पाहायला आलेल्या व्यक्तींशी बप्पीदा त्यावेळी काहीच बोलले नाहीत, त्यामुळे गैरसमज अधिकच वाढला.

Bappi Lahiri, Losing His Voice

असो. पण बप्पीदांचा मुलगा बाप्पा लाहिरी जो आपल्या वडिलांना पाहण्यासाठी लॉस एंजेलिसहून मुंबईत आला आहे, त्याने याबाबत खुलासा केला आहे. करोनाचे निदान झाल्यानंतर बप्पीजी फुफ्फुसाच्या आजारावर उपचार घेत असल्याचे त्याने सांगितले. तसेच डॉक्टरांनीच आपल्या वडिलांना लवकर बरे होण्याकरिता न बोलण्याचा सल्ला दिला असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दर्शकांना त्यांनी आवाज गमावला असे वाटले. त्याने आता स्पष्ट केले आहे की, ‘त्याच्या वडिलांचा उत्साह अजूनही कायम आहे आणि लवकरच ते बंगाली अभिनेत्री ऋतूपर्णा सेनगुप्तासोबत दुर्गा पूजेचे गाणे रेकॉर्ड करणार आहेत.’

Bappi Lahiri, Losing His Voice

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम