बालिका वधुमधल्या छोट्या आनंदीने म्हणजेच अविका ग...

बालिका वधुमधल्या छोट्या आनंदीने म्हणजेच अविका गोरने शेअर केले मालदीवमधले तिचे बिकीनी फोटोज् (‘Balika Vadhu’ Fame Avika Gor Shares Photos From Maldives Trip)

बालिका वधू या मालिकेतील छोटी आनंदी म्हणजेच अविका गोर आता खूपच स्टाइलिश झाली आहे. अविका  सध्या तिचा बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत मालदीवमध्ये मजेत वेळ घालवत आहे. अभिनेत्रीने मालदीवमधील तिच्या सुट्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अविका तिच्या स्टायलिश बीचवेअरमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

शेअर केलेल्या बिकीनी फोटोंमध्ये अविका वेगवेगळ्या रंगांच्या स्विमवेअरमध्ये दिसत आहे. या स्विमवेअरमध्ये तिने अनेक घायाळ करणाऱ्या पोज दिल्या आहेत. याव्यतिरिक्त तिने तिच्या काळ्या टॅंक टॉपमध्ये आणि निळ्या रंगाच्या टॉपमधील फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने, मी माझे मन मालदीवमध्येच सोडले आहे. मी तुम्हाला लवकरच भेटीन असे लिहिले आहे.

अविकाने फोटोंसोबतच एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडिओत ती बिकीनी घालून खूप मस्ती करताना दिसते. चाहते अविकाच्या या फोटोंचे खूप कौतुक करत आहे. अविकाचा बॉयफ्रेंड मिलिंदने पण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मालदीवमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोत तो समुद्र किनारी आरामात झोपला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, समुद्र किनारी आराम करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.

अविकाने २०२१ मध्ये तिच्या व मिलिंदच्या नात्याची कबुली दिली होती. दोघे अनेकदा फिरायला जात असतात.