बजरंगी भाईजान मधील ‘मुन्नी’ हर्षाली मल्होत्रा प...

बजरंगी भाईजान मधील ‘मुन्नी’ हर्षाली मल्होत्रा प्रतिष्ठित अशा भारत रत्न डॉ. आंबेडकर पुरस्काराने पुरस्कृत (Bajrangi Bhaijaan’s ‘Munni’ Harshali Malhotra Receives Bharat Ratna Dr Ambedkar National Award)

२०१५ साली आलेल्या सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटापासून सलमानला सर्व भाईजानच म्हणू लागले. या चित्रपटातून आणखी एक चेहरा अतिशय लोकप्रिय झाला होता, तो म्हणजे बजरंगीमधील लहान मुलगी मुन्नी हिचा. मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्राने सगळ्यांचेच लक्ष स्वतःकडे वेधून घेतले होते. या चित्रपटामध्ये तिने एका मुक्या मुलीची भूमिका केली होती, जी पाकिस्तानी होती आणि भारतात हरवली होती. सलमान खान म्हणजेच पवन कुमार चतुर्वेदी या मुन्नीला तिच्या देशात सुरक्षित पोहचवतो, असं या चित्रपटाचं कथानक होतं. या चित्रपटानंतर मुन्नी हर्षाली मल्होत्रा अतिशय लोकप्रिय झाली होती. तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली आणि आता हर्षालीला या वर्षीच्या प्रतिष्ठीत अशा भारत रत्न डॉ. आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हर्षालीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.   

या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर आणि मोठी झालेली दिसत आहेत. हर्षालीने कॅप्शनमध्ये लिहिलंय – श्री. भगत सिंह कोश्यारी (महाराष्ट्राचे राज्यपाल) यांच्या हस्ते भारत रत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त करताना धन्यता वाटत आहे.

हर्षालीने हा पुरस्कार सलमान खान, कबीर खान यांना समर्पित केला आहे. माझ्यावर विश्वास ठेवला, याकरिता हा पुरस्कार मी सलमान खान, कबीर खान आणि मुकेश छाबडा अंकल तसेच माझ्या बजरंगी भाईजानच्या संपूर्ण टीमला समर्पित करु इच्छिते, असेही तिने लिहिले आहे. तिच्या या पुरस्कारासाठी सर्वजण तिचे कौतुक करत आहेत अन्‌ तिला शुभेच्छा देत आहेत.