प्रभासला लग्नासाठी ५ हजार मुलींनी मागणी घातली ह...

प्रभासला लग्नासाठी ५ हजार मुलींनी मागणी घातली होती…. (‘Bahubali’ Fame Prabhas Received Marriage Offers From 5 Thousand Girls)

‘बाहुबली’ या अति सुपरहिट चित्रपटाचा नायक प्रभास हा सुपरस्टार पदावर जाऊन पोहचला आहे. त्याचा ‘राधेश्याम’ हा नवाकोरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचतो आहे. ‘राधे श्याम’ चे बजेट ४०० कोटी रुपये झालेलं आहे. त्याचा नायक प्रभासची अफाट लोकप्रियता पाहता, त्याने या चित्रपटासाठी ज्यादा मेहनताना घेतला असावा, असा कयास होता परंतु “चित्रपटासाठी योग्य ती आर्थिक गणितं जुळवित यासाठी मी माझे मानधन कमी केले,” असे त्याने विनयने जाहीर केले आहे.

‘बाहुबली’ च्या प्रचंड यशानंतर प्रभास घराघरात पोहचला. इतका की, त्याला ५ हजारांहून अधिक मुलींनी लग्नाची मागणी घातली होती. हे सर्व प्रस्ताव प्रत्यक्ष भेटीत, पत्राद्वारे आणि सोशल मीडियावरून त्याला आले होते. लोकप्रियतेच्या बाबतीत प्रभासचा हा नवा विक्रम म्हटला जातो. पण लग्न एक समस्याच आहे, त्यावर काही न बोललेलं बरं, अशी प्रभासची प्रतिक्रिया आहे. “बॉलिवूड मधील राजकुमार हिरानी हे आपले सर्वात आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडे काम करण्याची संधी आल्यास मी सोडणार नाही,” असेही प्रभास सांगतो.