रॅपर बादशहाने गायक केकेला दिली श्रद्धांजली, ते ...

रॅपर बादशहाने गायक केकेला दिली श्रद्धांजली, ते पाहून युजर्स म्हणाले, तू कधी मरशील ? रॅपरने दिली ही प्रतिक्रिया… (Badshah pays tribute to KK, troll asks him-Tu kab marega?, Rapper reacts)

31 मे 2022 रोजी संगीतविश्वातील आणखी एक तारा हरपला तो म्हणजे गायक केके. त्याच्या अकाली मृत्यूमुळे बॉलिवूडसोबतच त्याचा संपूर्ण चाहता वर्ग शोकसागरात बुडाला आहे. त्याच्या आधी दोन दिवस पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या झाली होती. त्याचे दु:ख पचत नाही तोवर आणखी एक दुख:द वार्ता कानी आली ती गायक केकेची. याप्रकरणी संगीतकार-रॅपर बादशहाने केकेला श्रद्धांजली म्हणून एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टवर युजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण त्या ट्रोलिंगला न जुमानता बादशहाने एक हटके मेसेज लिहून त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक केकेचा मृत्यू झाल्याने रॅपर बादशहाला धक्का बसला आहे. केकेच्या मृत्यूची बातमी मिळताच बादशहाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केकेचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला व त्या स्टोरी मध्ये फोटोवर फक्त ‘’क्यों ?’’ लिहित हार्टब्रेकचा इमोजी टाकला होता. बादशहाने ती स्टोरी शेअर करताच त्याला चित्रविचित्र मेसेज येऊ लागले. त्याच्या स्टोरीवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ” तू कब मरेगा ” आणि सोबतच खूप शिवराळ भाषेचा देखील वापर केला होता,

त्यावर बादशहाने त्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याची प्रतिक्रिया दिली. स्क्रीनशॉट शेअर करत बादशहाने लिहिले, “बस तुम्हाला ही कल्पना देण्यासाठी, की आम्ही रोज कसा वेगवेगळ्या नकारात्मकतेचा सामना करत असतो.”

त्या पोस्टमध्ये बादशहाने त्या ट्रोलरची ओळख सांगितली नाही. इन्स्टाग्रामवर त्याच्या पुढच्या स्टोरीत त्याने लिहिले की, तुम्ही जे पाहता तो एक भ्रम आहे, तुम्ही जे ऐकता ते खोटे आहे, काहीजण तुम्हाला भेटायला मरत असतात, तर काहीजण तुमच्या मरणाची प्रार्थना करतात.

रॅपर बादशहा हिंदी, हरियाणी आणि पंजाबी रिमिक्ससाठी प्रसिद्ध आहे. बादशहाने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर खूप कमी वेळात इंडस्ट्रीत जम बसवला. सध्या त्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे.पण तरीही त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. त्याला उलटेसुलटे मेसेज केले जातात. पण बादशहासुद्धा असे मेसेज करणाऱ्यांना त्याच्या पद्धतीने हॅण्डल करतो.