नखं चावण्यापासून ते पाय हलवण्यापर्यंत… या बॉलिव...

नखं चावण्यापासून ते पाय हलवण्यापर्यंत… या बॉलिवूड स्टार्सना आहेत वाईट सवयी (Bad habits of bollywood stars)

काही प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स कधी कधी त्यांच्या वाईट सवयींमुळेदेखील प्रसिद्धी मिळवतात. आज आपण बॉलिवूड स्टार्सच्या अशाच सवयींबद्दल बोलणार आहोत.

बॉलिवूड स्टार्स हे त्यांच्या अभिनय आणि सुंदर दिसण्यामुळे तर प्रसिद्ध असतातच, परंतु काही वेळा त्यांच्या खाजगी जीवनातील एखाद्या गोष्टीमुळेही ते चर्चेत येतात. या स्टार्सचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. चाहते आपल्या आवडत्या कलाकारांचे चांगलेच गुण पाहतात. परंतु या  बॉलीवूड स्टार्सना देखील काही वाईट सवयी असतात. आज आपण बॉलीवूड स्टार्सच्या अशाच सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.

राणी मुखर्जी

आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांना वेड लावणारी बॉलीवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी एकेकाळी एका वाईट सवयीने त्रस्त होती. राणी मुखर्जी एकेकाळी चेन स्मोकर होती. मात्र, आता तसे नाही आणि राणीने तिच्या या सवयीवर नियंत्रण ठेवले आहे.

करीना कपूर खान

करीना कपूर खान ही खूप लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिच्या हरेक अदांवर चाहते खुश असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की पतौडी कुटुंबातील सूनही एका वाईट सवयीमुळे त्रस्त आहे. होय, करीनालाही एक वाईट सवय आहे आणि ती म्हणजे नखे चावणे. होय, नखे चावताना ती अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जॉन अब्राहम

जबरदस्त बॉडीसाठी ओळखला जाणारा अभिनेता जॉन अब्राहम यालाही एक वाईट सवय लागली आहे. चाहते त्याचा फिटनेस पाहून प्रेरित होतात. परंतु तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, परंतु जॉनला बसून पाय हलवण्याची वाईट सवय आहे. जॉनला इच्छा असूनही या सवयीवर नियंत्रण ठेवता येत नाही.

आमिर खान

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान चित्रपटांमध्ये त्याच्या उत्तम अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळवतो. एकापेक्षा एक सरस चित्रपट देणाऱ्या आमिरलाही एक वाईट सवय आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याची माजी पत्नी किरण रावने खुलासा केला की, आमिरला रोज आंघोळ करायला आवडत नाही.