जेठालालला सोडून टप्पूवर फिदा झालेली बबिता पाहून...

जेठालालला सोडून टप्पूवर फिदा झालेली बबिता पाहून सोशल मीडियावर फनी मीम्स वाढले (‘Babita-Tapu’ Relationship Rumours, Jethalal Hilarious Memes Go Viral)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हास्य मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीताजी आणि टप्पूची भूमिका करणारा अभिनेता यांच्यातील प्रेमप्रकरणाबद्दल बोभाटा झाल्यानंतर सध्या सोशल मीडियावर जेठालाल आणि बबिताजी यांना उद्देशून फनी मीम्सचा वर्षाव होत आहे. सगळ्यांना माहीतच असेल, या मालिकेत जेठालाल बबितासाठी वेडा असतो असे दाखवले आहे. अशातच मुलगा टप्पू आणि बबीता यांच्यातील प्रेमसंबंधामुळे जेठालालच्या मनात काय चाललं असेल, याचा अंदाज लावण्यास मीमर्सनी सुरूवात केली आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल.   

ट्वीटरवर एका नेटकऱ्याने, बापाची सेटिंग कोणी अशी खराब करतं का भाऊ, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने बबीता व टप्पूच्या प्रेमप्रकरणावर जेठालालची प्रतिक्रिया कशी असेल ते सांगताना लिहिलंय, ‘आम्हाला घरातल्यांनीच लूटलंय, बाहेरच्यांची एवढी कुठली हिंमत.’

एका यूजरने तर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या दूसऱ्या पर्वाचीच कल्पना करून टाकली. या मीममध्ये त्याने बबीताला दया बेनची भूमिका दिली आहे, तर टप्पूला जेठालालचा लूक दिला गेला आहे.

नेटकऱ्यांनी मालिकेत बबीताच्या पतीचे पात्र निभावणाऱ्या मिस्टर अय्यर यांनाही सोडलं नाही, ज्यात त्याने म्हटलंय की सर्वजण जेठालालबद्दलच बोलताहेत, बिचाऱ्या अय्यरचा कोणी उल्लेखही करत नाहीयेत.

एक मीमरने अय्यरची प्रतिक्रिया देताना म्हटलंय, माझ्या पत्नीचं प्रेमप्रकरण सुरु आहे, आणि लोक जेठालालचं सांत्वन करताहेत हे पाहताना दुःख होतंय.

सर्व मीम्समध्ये भिडे मास्तरांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. बबीता आणि टप्पू यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे जणू काही भिडेच सर्वाधिक आनंदी दिसत आहे.

टिंगल करणाऱ्यांनी चंपक चाचालाही अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

अशाच एका मीममध्ये बबितासोबत पहिल्यांदा डेट वर जाताना टप्पूची प्रतिक्रिया कशी असेल, याचाही उल्लेख केला आहे.

एकंदरच बबीता जी आणि टप्पूच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्यांमध्ये ‘ तारक मेहता…’ ट्रेंड होऊ लागला आहे. शिवाय नेटकरीही आपापल्या अंदाजाने मीम्स शेअर करून मजा घेत आहेत. तुम्हीही पाहा काही मजेशीर मीम्स.