टी.व्ही.वरील पार्वती शिव्याकडे करण्यात आली होती...

टी.व्ही.वरील पार्वती शिव्याकडे करण्यात आली होती लैंगिक सुखाची मागणी : अभिनेत्रीने सांगितला हा वाईट अनुभव (Baal Shiv Fame Shivya Pathania Shares Her Casting Couch Experience, Deets Inside)

टीव्ही वरील बाल शिव मधील शिव्या पठानिया ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक पौराणिक कार्यक्रमांमध्ये काम केले .  शिव्याने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय तिने इतरही काही मालिकांमध्ये काम केले आहे. टाइम्स ग्रुपसोबतच्या मुलाखतीत शिव्याने तिचा एक अनुभव (कास्टिंग काउच) शेअर केला.

शिव्याने सांगितले की, तिची पहिली मालिका हमसफर बंद झाल्यानंतर तिच्याकडे आठ महिने काम नव्हते. त्यावळी ती कामाच्या संदर्भात मुंबईतील सांताक्रूझ येथे ऑडिशनसाठी गेली होती. तेव्हा तिथली खोली खूपच लहान होती. शिव्याने सांगितले की ,जेव्हा ती आत गेली तेव्हा तिथे एक व्यक्ती बसला होता जो स्वतःला निर्माता असल्याचे सांगत होता. त्याने शिव्याला सांगितले की, जर तुला एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी किंवा सुपरस्टारसोबत जाहिरात करायची असेल तर थोडी तडजोड करावी लागेल. त्या व्यक्तीने शिव्याला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते आणि त्यावेळेस त्याच्या लॅपटॉपमध्ये भजन वाजत होते.

शिव्या सांगितले की त्यावेळी मला त्याच्या बोलण्यावर राग आणि हसू दोन्ही येत होते.  मी त्याला म्हणाले की, तुला लाज वाटत नाही, एकीकडे तू भजने ऐकतोस आणि दुसरीकडे तू असे बोलत आहेस. त्यानंतर मी तेथून निघाले.

शिव्याने तिच्या मैत्रिणींना सावध आणि सतर्क राहण्यासाठी तिला आलेला अनुभव त्यांच्याशी शेअर केला. काही दिवसांनी तो माणूस निर्माता नाही आणि त्याचे कोणतेही प्रोडक्शन हाऊस नसून तो खोटा माणूस असल्याचे शिव्याला समजले.

शिव्याच्या मते, तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला नक्की काम मिळू शकते आणि तुम्ही पुढे जाऊ शकता.

शिव्याने ये है आशिकी, ये रिश्ता पार्टनरशिप का, दिल धूँता है मध्ये काम केले आहे, त्यात तिला ये रिश्ता पार्टनरशिप का मधून खूप ओळख मिळाली. याशिवाय तिने अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही काम केले आहे. – ज्यामध्ये तिने राधा कृष्ण मालिकेमध्ये राधा आणि राम सिया के लव कुशमध्ये सीतेची भूमिका साकारली होती.