आयुष्मानला आवडले नाही ताहिराने लिहिलेले पुस्तक,...

आयुष्मानला आवडले नाही ताहिराने लिहिलेले पुस्तक, बायकोबाबत केले खळबळजनक विधान (Ayushmann Khurrana Did Not Like Tahira’s Book, Said Surprising Thing About His Wife)

बॉलिवुड इंडस्ट्रीत असे अनेक कपल आहेत ज्यांना पाहून आपण कपलगोल्स असे आपसूकच बोलतो. त्यातीलच एक क्युट कपल म्हणजे अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप. सध्याचे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. आयुष्मान आणि ताहिरा देखील अनेकदा या सोशल मीडिया माध्यमाद्वारे त्यांचे एकमेकांवरील प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. पण आयुष्मानला मात्र ताहिराची एक गोष्ट आवडत नाही, त्याबाबत त्याने नुकताच खुलासा केला.

काही दिवसांपूर्वीच ताहिराने लिहिलेले ‘द 7 सिंस ऑफ बीइंग अ मदर’ हे पुस्तक लॉन्च झाले. वाचकांनी या पुस्तकाची फार प्रशंसा केली मात्र तिच्या नवऱ्याने हे पुस्तक अजूनही वाचलेले नाही. याबाबतचा खुलासा स्वत: आयुष्मानने त्याच्या ‘अनेक’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान केला. ताहिराने पुस्तकात लिहिलेल्या काही गोष्टी त्याला आवडल्या नसल्याचे देखील त्याच्या बोलण्यातून दिसून आले.

आयुष्मान म्हणाला की आतापर्यंत बऱ्याचजणांनी हे पुस्तक वाचले आहे. त्यांना ते मनोरंजनात्मक वाटले असेल पण मी त्यातला नाही. ताहिरा तिच्या मनात जे येईल ते लगेच करते पण मी तसा नाही. ताहिराने तिच्या पुस्तकात सेक्स लाईफपासून ते प्रेग्नंसीच्या प्रवासाबद्दल सर्व लिहिले आहे. या पुस्तकात ताहिराने लिहिले की, एकदा तिच्या मुलासाठी पंप केलेले ब्रेस्ट मिल्क तिचा नवरा प्यायला होता. तसेच मुलं झाल्यावर पुन्हा ते दोघे हनिमूनसाठी गेले होते पण त्यांचा तो हनिमून सक्सेसफूल झाला नाही.

आयुष्मान 12 वी ला फिजिक्स शिकण्यासाठी क्लासला जायचा तिथेच त्याची आणि ताहिराची ओळख झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कॉलेज संपल्यावर एम टीव्हीवरील रोडीज 2 या शो मधून आयुष्मानने त्याच्या करियरला सुरुवात केली. तो त्या शोचा विजेता ठरलेला. त्याच दरम्यान आयुष्मानने ताहिराला लग्नासाठी मागणी घातली आणि मग दोघांनी लग्न केले. या जो़डप्याला आता विराजवीर आणि वरुष्का ही दोन मुले आहेत.