अभिनेता आयुष्मान खुरानाने मुंबईत करोडोंमध्ये खर...

अभिनेता आयुष्मान खुरानाने मुंबईत करोडोंमध्ये खरेदी केले स्वप्नातले घर, किंमत ऐकून उडतील होश (Ayushmann Khurrana buys a luxurious house in Mumbai, the price of this lavish apartment will shock you)

आयुष्मान खुराना बॉलिवुडमधील अतिशय टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक असून तो नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळे चित्रपट स्वीकारतो. आयुष्मानने एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले आहेत. सध्या तो ‘चंडीगढ़ करे आशिकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आयुष्मानने मुंबईत आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आणि आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्ही चकीत व्हाल.

आयुष्मान खुरानाने अलिकडेच मुंबईमध्ये एक ड्रीम होम खरेदी केले आहे आणि लवकरच ती आपली बायको ताहिरा कश्यप आणि मुलांसोबत या नव्या घरी शिफ्ट होणार आहेत. आयुष्मानने जे अपार्टमेंट विकत घेतलं आहे ते अंधेरीमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या ‘विंडो ग्रँड रेसिडेन्सेस’ बिल्डिंगमध्ये आहे. याची किंमत ऐकून हैराण व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार या आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या अपार्टमेंटची किंमत १९ करोड रुपये इतकी आहे. या अपार्टमेंटच्या नुसत्याच स्टँप ड्युटीसाठी ९६.५० लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यांचे हे आलिशान अपार्टमेंट ४ हजार स्वेअर फिटमध्ये पसरलेले आहे आणि येथे चार कार पार्क होऊ शकतील एवढी ऐसपैस जागा आहे. खरं तर या अपार्टमेंटची डिल मागच्या वर्षी २९ नोव्हेंबरलाच झाली होती. आयुष्मानचा भाऊ अपारशक्तीनेही याच अपार्टमेंटमध्ये असेच आलिशान घर घेतले आहे, ज्याची किंमत ७ कोटी सांगितली जाते.     

ही बिल्डिंग हळूहळू बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचा आशियाना बनली आहे. नवं जोडपं कतरिना कैफ- विकी कौशल यांच्या व्यतिरिक्त अनुष्का शर्मा-विराट कोहली आणि अर्जुन कपूर ने देखील याच अपार्टमेंटमध्ये घर घेतलं आहे. म्हणजे आयुष्मान आता या सर्व मंडळींचा शेजारी होईल.

याआधी आयुष्मानने चंढीगड येथील पंचकुलामध्ये एक कोठीच घेतली होती. आपल्या संपूर्ण परिवाराने एकत्र राहावे असा विचार करून काही वर्षांपूर्वी त्याने ९ कोटी रुपयांना ही कोठी खरेदी केली होती. त्याचा भाऊ अपारशक्तीही या घरामध्ये बरोबरीचा भागीदार आहे.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे तर नुकताच आयुष्मानचा ‘चंडीगढ़ करे आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय लवकरच तो ‘डॉक्टर जी’, ‘अनेक’ आणि ‘ॲक्शन हीरो’ यांसारख्या चित्रपटात दिसेल.