‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेच्या ऑडिशनम...

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेच्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालेल्या आयुष्मानने या कारणामुळे दिला डेली सोप करण्यास नकार (Ayushmann Khurrana Auditioned for ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi’, Because of This He Did Not Act in Daily Soap)

अभिनेता आयुष्मान खुराना अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने कोणाचाही वरदहस्त नसताना इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान पक्के केले. आयुष्मानने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली होती. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. एम टीव्हीवरील रोडीज शोच्या दुसऱ्या सिजनचा विजेता झाल्यावर आयुष्मानसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले.

 २०१२ मध्ये आलेल्या विक्की डोनर या सिनेमातून आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री यामी गौतमीने काम केले होते. आय़ुष्मानने एकता कपूरच्या  ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या गाजलेल्या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पण एका खास कारणामुळे त्याने डेली सोपमध्ये अभिनय करण्यास नकार दिला.

आयुष्मानने सांगितले की, एक असा काळ होता जेव्हा त्याला अभिनय करण्याची फार इच्छा होती. त्यासाठी त्याने बालाजी टेलीफिल्मच्या ‘कसौटी ज़िंदगी की’किंवा  ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या दोन मालिकांपैकी कोणत्यातरी एका मालिकेसाठी ऑ़डिशन दिली होती.

त्यावेळी आयुष्मानने ऑ़डिशन तर दिल्या मात्र अचानक त्याने त्यातून काढता पाय घेतला. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला की, ज्यावेळी मी त्या मालिकेसाठी ऑडिशन दिले नेमके त्याचवेळी माझे  आरजेसाठी सिलेक्शन झाले. याबाबतची माहिती त्याने मालिकेच्या कास्टिंग डायरेक्टरला दिली व तो मालिका करत नसल्याचा त्याचा निर्णय त्याने सांगितला. आयुष्मानने नकार दिल्यावर तो रोल पुढे अभिनेता पुल्कित सम्राटला मिळाला. पुल्कितनेसुद्धा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’याच मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्या मालिकेत त्याने लक्ष्य वीरानी हे पात्र साकारले होते.

विकी डोनर चित्रपट केल्यानंतर आय़ुष्मानने ‘दम लगा के हैशा, ‘बरेली की बर्फी, ‘बधाई हो, ‘ड्रीम गर्ल, ‘बाला, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’यांसारखे सुपरहिट चित्रपट केले. आयुष्मानचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कोणतेच चित्रपट आतापर्यंत फ्लॉप झालेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच आयुष्मानचा ‘अनेक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटात आयुष्मान व्यतिरिक्त जेडी चक्रवर्ती, एंड्रिया केविचुसा, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केला असून तो भारताच्या पूर्वोत्तर दिशेला राहणाऱ्या लोकांवर आधारित आहे. लवकरच आयुष्मान ‘डॉक्टर जी’ या विनोदी चित्रपटात दिसणार आहे. त्यात त्याच्यासोबत  रकुल प्रीत सिंह, शेफाली शाह आणि शीबा चड्ढा हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात आयुष्मान एक अनोखे पात्र साकारणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत.