भारताने क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल...

भारताने क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्याने आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेने दोस्तांसोबत केली डान्स पार्टी (Ayushmann Khurrana-Ananya Panday Start Dance Party With Friends After Last Night’s India vs Pak win, Watch Funny Video)

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे हे असे कलाकार आहेत जे मौजमजा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काल रात्री त्यांनी भारताने क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या आनंदात दोस्तांसोबत डान्स करुन एक विनोदी व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओत हे दोघे मित्रांसह काला चष्मा या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सगळ्यांनी पायजमे घातले आहेत.

सुरुवातीला एका मोठ्या दिवाणखान्यात आयुष्मान-अनन्या आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळताना दिसतात. अभिनेता मनज्योत सिंह आजकाल इन्स्टाग्राम रीलवर बेहद लोकप्रिय असलेल्या ऑर्केड बॅक या स्टेपवर स्लाईड करतो. तर पाताल लोक प्रसिद्ध अभिषेक बॅनर्जी सोबत बाकीचे लोक विनोदी नृत्य करतात.

हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच चाहते तर सोडाच पण चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी खुल्या दिलाने त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तसेच पाकिस्तानातील त्यांचे प्रशंसक मोकळ्या मनाने कमेंटस् करत आहेत. एकाने तर लिहिलं की, आजच्या या रोमांचक सामन्याबद्दल भारतासह पाकिस्तानचे पण अभिनंदन. मी पाकिस्तानी असलो तरी मला आनंद  झाला आहे. आपण बंधूभाव वाढवला पाहिजे आणि शांततेने राहिले पाहिजे.

दुसऱ्या एका प्रशंसकाने लिहिलं की, बंधूभाव वाढवा, असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो.’