‘पिछेवाले बाबू हेल्मेट लगा लो’ म्हणत रेडिओ सिटी...

‘पिछेवाले बाबू हेल्मेट लगा लो’ म्हणत रेडिओ सिटीच्या आरेजींची जनजागृती..(Awareness of Radio City’s RJ for helmet enforcement)

सध्या सर्वत्र वाहनांची संख्या वाढत चाललेली दिसते. त्यातल्या त्यात दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. सध्याची तरुणाई शो-शायनिंगच्या नादात कशीही बाईक चालवतात. शिवाय रस्त्यांवरील खड्डे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता पावसाळा सुरु झाल्याने वाहने हळू चालवा, दुचाकीवर बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेटचा वापर करा अशा जनजागृती करणाऱ्या जाहिरातींना सुरुवात झाली आहे.


याच जनजागृतीसाठी आता रेडिओ सिटीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वांद्रे कार्टर रोड येथे मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने हेल्मेटचे मोफत वाटप केले. पावसाळ्यात खड्डयांची संख्या जास्त असते. त्यात मुंबईसारख्या शहरात धावपळ अधिक असल्याने वाहने वेगात चालवली जातात. घाईगडबडीत अनेकदा अपघाताचा धोका असतो. या अपघातात हेल्मेट नसल्यामुळे जीव जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच रे़डिओ सिटीच्या आरजेंनी रस्त्यावर उतरुन जनजागृती करण्यात पुढाकार घेतलेला आहे.

या जनजागृतीसाठी रस्त्यावरुन विना हेल्मेट फिरणाऱ्यांना आरजें, ‘’पिछेवाले बाबू हेल्मेट लगा लो’’असे आगळेवेगळे गाणे गात हेल्मेटचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी विना हेल्मेट फिरणाऱ्यांना मोफत हेल्मेट वाटपही केले आहे.