दिमाखदार शोभायात्रेने सुरू होणार पुरस्कार सोहळा...

दिमाखदार शोभायात्रेने सुरू होणार पुरस्कार सोहळा (Award Function To Open With T.V. Stars Studded Procession)

स्टार प्रवाह वाहिनीवरील कार्यक्रमातील विजेत्यांचा पुरस्कार सोहळा आज प्रक्षेपित होणार आहे. या सोहळ्याची सुरुवात दिमाखदार शोभायात्रेने होणार आहे.

ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक पोशाखांना आधुनिकतेची जोड देत, दिमाखात मिरवणारे कलाकार या सोहळ्याची सुरुवात करणार आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी ज्याप्रमाणे शोभायात्रा निघतात, तशीच ही शोभायात्रा आहे.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा, मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात झाला होता. तेव्हा रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्षवेधी होता. याच सोहळ्याचे प्रक्षेपण आज संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

आघाडीचे कलाकार व तंत्रज्ञ यांना या पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असून विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २० दिग्दर्शकांना गौरवण्यात येणार आहे. मालिकेला प्रेक्षकांसमोर रंजकरित्या आणण्याचे मोठे काम दिग्दर्शक करतो. त्यांना सन्मानित करण्याचे स्टार प्रवाहने ठरविले आहे.