आर्यन खान ड्रग केस : कमी प्रमाणात ड्रग घेणाऱ्या...

आर्यन खान ड्रग केस : कमी प्रमाणात ड्रग घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नका : सामाजिक न्याय मंत्रालयाची मागणी (Avoid Jail For Small Quantity Users : Recommends Social Justice)

कोवळ्या वयाच्या आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग केसमध्ये तुरुंगात टाकल्यापासून देशभरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. प्रदेशात आहे त्याप्रमाणे कमी प्रमाणात ड्रग घेणे कायदेशीर करा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. तर काही लोक नार्कोटिक्स ड्रग कायदा बदलण्याची मागणी करत आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने अशीच शिफारस केली आहे. अंमली पदार्थ घेणार्यांना तुरुंगात धाडण्याऐवजी मानवतावादी दृष्टिकोन दाखविण्याची शिफारस आहे.

सतःसाठी कमी प्रमाणात ड्रॅग घेणारे व जे त्याच्या व्यसनाधीन झाले आहेत, त्यांना तुरुंगात न धाडता , पुनर्वसन केंद्रात ठेवावे. म्हणजे सुधारण्याची संधी मिळेल, असेही त्या शिफारसीत म्हटले आहे.