देशी अवतारात अवनीत कौरने दाखवला जलवा : निळ्या प...

देशी अवतारात अवनीत कौरने दाखवला जलवा : निळ्या प्रिंटेड साडीमध्ये मादक पोझेस देऊन चाहत्यांना केले घायाळ (Avneet Kaur Looks Drop-Dead Gorgeous In Desi Avatar As She Shares Latest Pictures In Blue Printed Saree)

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अवनीत कौरने फारच चांगली लोकप्रियता मिळवली आहे. ती बालपणापासूनच टॅलेन्टेड आहे. तिची नृत्यकला सगळ्यांनाच माहिती होती. पण अभिनय कौशल्य दाखवून तिने याही क्षेत्रात नाव कमावले. आता तर ती स्टाईल आयकॉन बनली आहे. अन्‌ बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत आहे.

अवनीत सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो प्रकाशित करत असते. आधुनिक पेहरावात ती कमालीची सुंदर दिसते. पण आता देशी अवतारात आपले फोटो प्रसिद्ध करून तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.

अवनीतने आपले ताजे फोटोशूट इन्स्टाग्राम वर शेअर केले आहेत. त्यात तिने निळी- रफल्ड साडी आणि सॅटिनचा स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे. या पेहरावात तिने अत्यंत मादक पोझेस दिल्या आहेत.

अवनीतने यासाठी सागर वेणी घातली आहे. शिवाय ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली आहे. तर लाइट आयशॅडो, काळे काजळ आणि न्यूड लिपस्टीकने आपले लूक परफेक्ट केले आहे.

या फोटोंवर तिने, ‘मुझ पे छाया है जो नूर तेरा’ अशा ओळी लिहून निळ्या रंगाचा हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. अवनीचा हा मादक देशी अवतार बघण्याजोगा आहे.