आकाश उजळून टाकणारे आकर्षक कंदील (Attractive Lan...

आकाश उजळून टाकणारे आकर्षक कंदील (Attractive Lanterns Give Colorful Look To Diwali)


दिवाळीची ओळख म्हणजे पणत्या, फटाके आणि आकाश उजळून टाकणारे कंदील. मागच्या वर्षीची दिवाळी कोरोनाच्या सावटावाली होती. त्यामुळे या आकाश कंदिलांचा बाजार नरम होता. परंतु यंदा बाजाराने उसळी घेतली असल्याने आकाशकंदील पुन्हा उजळले आहेत. पूर्वी चिनी कंदील, इलेक्ट्रिक मळा यांची रेलचेल असायची परंतु कोरोनाला जन्म दिलेल्या चिनी मुलाकडे ग्राहकांनी यंदा पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.


त्यामुळे भारतीय बनावटीचे बांबू, कागद, कार्डबोर्ड, फायबर जाळी, कापड यापासून बनवलेली आकाशकंदील बाजारात, व पर्यायाने घराघरात प्रकाशमान झालेले आहेत.
दारावर, अंगणात, चाळीच्या किंवा सोसायटीच्या आवारात लावलेल्या आकाशकंदिलांमुळे दिवाळीचा झगमगाट अधिक वाढतो. परिसर रंगीबिरंगी दिसतो.
पूर्वी बांबूच्या काड्या किंवा पतंगाच्या कागदाने घरोघरी कंदील तयार केले जायचे. पण आता वेळेअभावी याच साहित्यांने बनविलेल्या रेडिमेड कंदिलांस मोठी मागणी आहे.