अथिया शेट्टी आणि केएल राहुल पुढच्या वर्षी जानेव...

अथिया शेट्टी आणि केएल राहुल पुढच्या वर्षी जानेवारी वा फेब्रुवारीमध्ये बोहल्यावर चढतील? (Athiya Shetty-KL Rahul To Tie The Knot In January or February Next Year?)

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मीडियानुसार, यापूर्वी अशी बातमी आली होती की अथिया शेट्टी आणि केएल राहुल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. पण सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या बातम्यांनुसार, हे लव्हबर्ड्‌स पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत बोहल्यावर चढतील.

क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या नुसत्याच अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु या लव्हबर्ड्‌सचे प्रेम लग्नापर्यंत कधी पोहोचणार याबद्दल काही निश्चित माहिती मिळालेली नाही. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की ते दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. पण आता हे वृत्त फेटाळून लावत, लव्ह बर्ड्सच्या लग्नाची एक ताजी बातमी सुत्रांकडून समोर आली आहे.

मीडियाच्या ताज्या बातम्यांनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याचे समजते. तरीही अजून लग्नाची तारीख आणि जागा निश्चित झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी, अथिया शेट्टीने तिच्या लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले होते आणि पुढील तीन महिने लग्नाची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते. अथिया शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये सोशल मीडिया यूजर्सची खिल्ली उडवली आणि हे कॅप्शन लिहिले, ‘मला आशा आहे की मला ३ महिन्यांत लग्नासाठी आमंत्रित केले जाईल… lol’

सध्या तरी या बातमीत कितपत तथ्य आहे हे कळू शकलेले नाही. पण आशा आहे की लव्हबर्ड्स लवकरच लग्न करतील.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)