अवनीत कौरने वयाच्या 21 व्या वर्षी कमावली कोटींच...

अवनीत कौरने वयाच्या 21 व्या वर्षी कमावली कोटींची संपत्ती (At The Age Of 21, Avneet Kaur Is The Mistress Of Crores)

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अवनीत कौरची ओळख आहे. ती केवळ 21 वर्षांची आहे. पण एवढ्या लहान वयात तिने स्वतःच्या हिमतीवर कोटींची संपत्ती मिळवली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच अवनीत डान्सर आणि कंटेण्ट क्रिएटर देखील आहे. अवनीतचे इंस्टाग्रामवर ३१.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती  दररोज आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या व्हिडिओ आणि फोटोंना चाहते खूप लाइक्स व कमेंट करत असतात.

 13 ऑक्टोबर 2001 ला अवनीत कौरचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. तिचे वडील एका कंपनीत काम करतात आणि आई गृहिणी आहे. अवनीत सध्या मुंबईत राहते. अभिनयासोबतच तिने आपला अभ्यासही सुरू ठेवला आहे. गेल्या वर्षीच अवनीतने बारावीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत तिला 74 टक्के गुण मिळाले.

अवनीत कौरने आपल्या करीअरची सुरुवात टीव्हीवरील डान्स शो ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर’मधून केली होती. मात्र, या शोच्या उपांत्य फेरीत ती बाहेर पडली. या डान्स शोनंतर अवनीतने आणखी एका डान्स शोमध्ये भाग घेतला.  त्यानंतर अवनीतने ‘मेरी माँ’ या मालिकेतून आपल्या अभिनयातील करीअरची  सुरुवात केली. याशिवाय ती ‘झलक दिखला जा 5’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘सावित्री’, ‘चंद्र नंदिनी’, ‘हमारी सिस्टर दीदी’ आणि ‘अलादीन – नाम तो सुना होगा’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. इतकंच नाही तर अवनीतने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही साकारल्या आहेत. आता नुकतेच अवनीतने ‘टिकू वेड्स शेरू’ या आपल्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

अवनीत कौरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास मिळालेल्या माहितीनुसार तिची एकूण संपत्ती 7 कोटींच्या आसपास आहे. अवनीत वयाच्या २१ व्या वर्षी करोडोंची मालकीण आहे. अभिनयाव्यतिरिक्त, ती सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनल पोस्टमधून देखील कमाई करते. याशिवाय ती दरवर्षी चित्रपट, टीव्ही आणि म्युझिक व्हिडिओंमधून सुमारे 1 कोटी रुपये कमावते. ब्रँड एंडोर्समेंटमधून ती दरमहा सुमारे 8 लाख रुपये कमावते.

अवनीतला महागड्या गाड्यांचीही खूप आवड आहे. तिच्याकडे 80 लाख रुपयांची रेंज रोव्हर कार आहे. याशिवाय स्कोडाची कोडियाक, ह्युंदाईची क्रेटा आणि टोयोटाची फॉर्च्युनर एसयूव्ही देखील आहे. गाड्यांव्यतिरिक्त अवनीतला महागड्या हँडबॅगचीही आवड आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम