वयाच्या पन्नाशीतही षोडशेचा उन्माद! कश्मीरा शहाच...

वयाच्या पन्नाशीतही षोडशेचा उन्माद! कश्मीरा शहाची कमावलेली फिगर बघून चाहते म्हणताहेत, ‘एज इज जस्ट ए नंबर’ (At 50 I Am Just Beginning My Life, Says Kashmera Shah As She Shares A Hot Bikini Photo, Fans Say- Age Is Just A Number)

बॉलिवूड तारकांच्या हॉटनेसचा विषय निघाला की, कश्मीरा शहाचे नाव त्यात हटकून येतेच. आपल्या बिनधास्त वागण्याने आणि बोल्डनेस बाबत ती फारच प्रसिद्ध आहे. ती कोणाचीही पर्वा करत नाही. कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्या वादात किंवा सुनीता आहुजा यांच्यावर केलेला पलटवार यावर तिने सडेतोड उत्तर दिलेले आहे.

आपले शरीर सुडौल केल्यानंतर कश्मीराने आपली बिकीनीमधील बोल्ड छायाचित्रे शेअर केली आहेत. तिनं स्वतःहून असंही सांगितलं की, मी स्वतःला १६ व्या वर्षाच्या मुलीसारखी फिट आणि सेक्सी समजते आहे.

बिकिनीमध्ये कश्मीरा जी काही कमनीय दिसते ते बघून ती ५० वर्षांची आहे, असं कोणी म्हणणार देखील नाही. तिच्या पुढ्यात कमी वयाच्या तरुणी फिक्या पडतात. अलिकडेच कश्मीराने बिकिनीत फोटो पोस्ट करून लिहिलं आहे की, ५० च्या वयात मी आयुष्याला सुरुवात करते आहे… तिच्या चाहत्यांना ही ओळ आणि फोटो खूपच आवडले आहे.

हा फोटो प्रसिद्ध होताच त्याला काही मिनिटातच चिक्कार लाइक्स आणि कमेंटस्‌ मिळाले. चाहत्यांनी लिहिलं – ‘एज इज जस्ट ए नंबर… वय वाढलं तरी तू अधिकच हॉट आणि सेक्सी दिसते आहेस…’

‘तू सेक्सी आहेस, हे तुलाही माहीत आहे गं…’ असं म्हणत चाहते तिची स्तुती करत आहेत. काही चाहते तिला प्रिन्सेस म्हणत आहेत, तर काही जण फायरचा इमोजी पोस्ट करून म्हणताहेत, बस्स… मन तरुण असलं पाहिजे.