‘आश्रम’ च्या सेटवर बजरंग दलाचा हल्ल...

‘आश्रम’ च्या सेटवर बजरंग दलाचा हल्लाबोल (‘Ashram’ Web Series Set Vandalised By Bajrang Dal)

सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम ३’ या वेब सिरीज्‌च्या सेटवर बजरंग दलाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करून त्याचे चित्रिकरण बंद पडले.

सध्या चांगलीच लोकप्रिय असलेल्या या वेब सिरिजचे शूटिंग भोपाळ येथील अरेरा हिल्स परिसरात चालते. तेथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण करून सेटची तोडमोड केली. काही मोटार-गाड्यांची नासधूस केली. मालिकेच्या ‘आश्रम’ या नावालाच आक्षेप घेत त्यांनी हा हल्ला केला. तसेच प्रकाश झा यांच्या तोंडावर शाई फेकली.

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आश्रमास चांगली परंपरा आहे, त्याचे पावित्र्य घालवून बदनामी करू नका, असा इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रकाश झा यांना दिला. नाव बदलले नाही, तर या मालिकेचे शूटिंग होऊ देणार नाही. इतकेच नव्हे तर टी. व्ही. वरून त्याचे प्रसारण होऊ देणार नाही, असाही इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

या मालिकेत एका लबाड व ढोंगी स्वामीजींची भूमिका बॉबी देओल करीत आहे.