‘रोडीज- जर्नी इन साउथ अफ्रिका’ या सर्वात मोठ्या...

‘रोडीज- जर्नी इन साउथ अफ्रिका’ या सर्वात मोठ्या साहस शो मध्ये आशिष भाटिया आणि नंदिनी ठरले चँपियन्स’ ( Ashish Bhatia And Nandini Wins The Championship Of The Most Adventurous Reality Show ‘ Roadies Journey In South Africa’ )

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अशा ‘एमटीव्ही रोडीज-जर्नी इन साउथ आफ्रिका’ या शो चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. पण यावेळी हा सामना खूपच अटीतटीचा असल्यामुळे पहिल्यांदाच एक नाही तर दोन सर्वोच्च विजेते मिळाले आहेत! या शोमधील आव्हाने, एलिमिनेशन्स, नाट्यमय वळणं आणि दक्षिण आफ्रिकेतील रोमांचक परिसरात अनेक आठवड्यांच्या स्पर्धेनंतर आशिष भाटिया आणि नंदिनी ही जोडी नवीन सीजनचे ‘अल्टीमेट चँपियन्स’ ठरले आहेत. सुपरस्टार आणि समाज सेवक सोनू सूदने यावेळी हा शो होस्ट केला होता. या शोचा महाअंतिम सोहळा खूपच रंजक होता. विजेते पद मिळवण्यासाठी स्पर्धकांनी शर्थीची झुंज दिली होती!

महाअंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही स्पर्धक सर्वोत्तम होते. ‘रेस टू द टॉप’ या फेरीत  असाधारण डावपेच, निश्चय आणि दृढतेची गरज होती. फायनलिस्टस जोड्या केव्हीन अल्मा सिफर-मूस जट्टाना, युक्ती अरोरा- जसवंत बोपन्ना, गौरव अलुग- सिमी तलसानिया आणि आशिष भाटिया- नंदिनी ह्यांना अनपेक्षित व तब्बल 4 टप्पे असलेल्या खडतर आव्हानांना सामोरे जावे लागले. केपटाऊन सारख्या रमणीय शहरात पार पडलेल्या या महाअंतिम फेरीत आशिष आणि नलिनी यांनी बाजी मारली. विजेत्यांच्या जल्लोषामध्ये होस्ट सोनू सूदनेही लाईव्ह साउथ आफ्रिकन संगीताच्या तालावर ठेका धरला होता.

शो जिंकल्यानंतर आशिष भाटियाने म्हटले, “मी अतिशय आनंदित आणि त्याबरोबर थोडा भावुक झालो आहे. हा शो माझ्यासाठी खास आहे आणि एम टीव्ही रोडीज इन साउथ आफ्रिका जिंकणे हे माझ्यासाठी प्रत्यक्षात साकार झालेलं स्वप्न आहे. या शोमधील प्रवास अतिशय थरारक होता. शिवाय माझी जोडीदार नंदिनीसोबत जिंकल्याबद्दल मी शोचा अतिशय आभारी आहे.”

हा सीजन जिंकल्यामुळे नंदिनीनेही आपला आनंद व्यक्त करत म्हटले, “माझ्यासाठी हे किती खास आहे, हे मी सांगू शकत नाही. एम टीव्ही रोडीज जर्नी इन साउथ आफ्रिकाने दररोज आणि प्रत्येक गोष्टीत मी मला  सर्वोत्तम कशी बनवीन हे शिकवले. मला अजूनही मी जिंकल्याचे खरे वाटत नाही. माझ्या मते मी हा शो जिंकवा यासाठी देव माझी आधीपासून तयारी करुन घेत होता.

रोडीजचा हा सीजन पहिल्यांदाच पूर्णपणे परदेशी शूट झाला. दक्षिण आफ्रिकेतील खडतर स्थळांवर शूट झालेल्या ह्या सीजन मध्ये सुरुवातीपासूनच रोमांच होते!’