लता मंगेशकर यांना अशीही श्रद्धांजली…. दी...

लता मंगेशकर यांना अशीही श्रद्धांजली…. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आज सर्व इलाज मोफत. (As A Tribute To Lataji, All OPDs Will Run Free Of Charge At Dinanath Hospital)

गानकोकिळा लतादीदी मंगेशकर यांचे काळ महानिर्वाण झाल्यावर कुणीतरी संदेश पाठवला,
प्रभू कुंज मधली बासरी …..
प्रभू घेऊन गेला आपुल्या घरी …..
त्यावर लक्षात आले की, माणुसकीचा झरा  मात्र मागे ठेवून गेला. त्यामुळेच लतादीदींना अनोखी श्रद्धांजली म्हणून आज पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात सर्व बाह्य रुग्णांना (व.पी.डी. पेशंट्स) अर्थात आज उपचारांसाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना सर्व उपचार मोफत दिले जाणार आहेत. ही सवलत दिवसभर चालू असणार आहे.