शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि शक्ती कपूरचा मुलगा...

शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत नार्कोटिक्स शाखेकडून ताब्यात (Aryan Khan, Son Of Shahrukh Khan And Siddanth, Son Of Shakti Kapoor Allegedly Detained By NCB)

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (नार्कोटिक्स ब्रँच) शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धान्त कपूर यांना ताब्यात घेतले असल्याची खबर आहे.

Aryan Khan, Siddanth Kapoor, Allegedly Detained By NCB, drug party

मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या प्रवासी बोटीवर भर समुद्रात रेव्ह पार्टी सुरू असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी पथकास लागली होती. त्यानुसार ही कारवाई झाली. सदर पार्टत अंमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याची खबर मिळाल्यावरून सदर शाखेच्या अधिकाऱ्यांनी झडती सत्र आरंभले असता अंमली पदार्थ विकणाऱ्या व सेवन करणाऱ्या जवळपास ८ ते ९ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये या दोन कोवळ्या मुलांचा समावेश असल्याची बातमी आहे. मात्र ज्या तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यामध्ये या दोन मुलांचा समावेश असल्याचे अधिकृतरित्या सदर पथकाने जाहीर केलेले नाही. परंतु सदर बोटीवर असलेल्या लोकांकडून ही माहिती मिळाली आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेल्या संशयित तरुणांना आज सकाळी विशेष कोर्टात हजर केले जाणार असल्याची खबर आहे.