आर्यन खान ‘या’ अलिशान क्रूझमध्ये कर...

आर्यन खान ‘या’ अलिशान क्रूझमध्ये करत होता पार्टी (Aryan-khan-Drugs Party See That Luxurious Cruise Pics)

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आर्यन खान प्रवास करत असलेल्या बोटीबद्दलचा तपशील जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. ही बोट नेमकी कशी आहे, याचे एका दिवसाचे भाडे नेमके किती? याबद्दल अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

किंग खानचा सुपुत्र जरी आपल्या बाबाइतका लाइमलाइटमध्ये नसला तरी अतिशय आलिशान जीवनशैलीची आवड असणारा आहे. आर्यनला ज्या क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. या क्रूझचं नाव Cordelia आहे. ही क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे. या क्रूझमध्ये अनेक आलिशान सुविधा उपलब्ध आहेत.

Aryan-khan-Drugs Party, Luxurious Cruise Pics

या क्रूझची बरीच खास वैशिष्ट्यं असून त्यामुळे अनेक सेलिब्रेटी याकडे आकर्षितही होतात. या क्रूझमध्ये फूड पॅव्हेलिअन, ३ स्पेशल रेस्टॉरंट आणि ४ बार आहेत. तसंच स्पा, स्विमिंग पूल वैगरे देखील आहेत. या क्रूझमध्ये कॅसिनो, नाइट क्लब, लाइव्ह बँड, डिजे आणि एक थिएटर देखील आहे. विशेष म्हणजे यात शॉपिंग कॉम्पलेक्स आणि अॅडव्हेंचर अॅक्टिविटीसाठी सुविधा करण्यात आली आहे.

या क्रूझवर इतक्या सुविधा दिल्या गेल्या असल्या तरी त्याचे पॅकेज फार महाग आहे. कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज १७७०० पासून सुरू होते. हा दर केवळ एका रात्रीसाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज ५३१०० रुपये आहे. यामध्ये दोन जणांचा समावेश होऊ शकतो. तर, दोन जणांसाठी दोन रात्रीचे हाय सी पॅकेज ३५४०० रुपये आहे.

Aryan-khan-Drugs Party, Luxurious Cruise Pics

याच क्रूझवरुन आर्यन खान याच्यासह ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रुझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची टीप एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांना मिळाली. त्यानुसार २ ऑक्टोबर रोजी त्यांचे काही सहकारी प्रवासी म्हणून क्रुझवर दाखल झाले. याचे भाडे प्रतिमाणसी ८० हजार रुपये इतके होते. ही क्रुझ मुंबईहून गोव्याकडे रवाना झाल्यानंतर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टी सुरू झाली. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये आर्यन खानसह आठजणांचा समावेश होता.

(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)