आर्यन खानने तुरुंगात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दि...

आर्यन खानने तुरुंगात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलं वचन, म्हणाला – ‘असे काहीतरी करेन, ज्यामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल.’ (Aryan Khan Assured NCB That He Will Do Something That Will Make You Proud Of Me)

किंग खानचे कुटुंब सध्या खूपच दयनीय परिस्थितीतून जात आहेत. ड्रग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा जामीन एका कारणास्तव पुढे ढकलला जात आहे. आर्यन सध्या तुरुंगात आहे आणि आता त्याच्या जामीन अर्जावर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, आर्यन खानने NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो गरिबांना मदत करणार असल्याचे वचन दिले होते.

Aryan Khan, NCB

‘एक दिवशी तुम्हाला माझा अभिमान वाटेल’

अलीकडेच समीर वानखेडे यांनी आर्यन खानसह त्याच्या टीमचं समुपदेशन केलं होतं. या दरम्यान, आर्यनने त्याला सांगितले की तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो गरीब आणि दुर्बल लोकांना मदत करेल. अहवालांनुसार, समुपदेशन सत्रात आर्यनने एनसीबीला वचन दिले की तो भविष्यात कधीही काहीही चुकीचे करणार नाही, ज्यामुळे तो चर्चेत येईल. यासह, आर्यन म्हणाला, ‘मी नक्कीच असे काहीतरी करेन, ज्यामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल.’

व्हिडिओ कॉलवर पालकांशी बोलताना आर्यन भावूक झाला

Aryan Khan, NCB

दरम्यान, आर्यन खानने जेलमधून व्हिडिओ कॉलद्वारे शाहरुख आणि गौरी खानशी संवाद साधला. बातमीनुसार, आर्यन त्याच्या आई आणि वडिलांशी बोलत असताना खूप रडला. कोविडच्या प्रोटोकॉलनुसार तुरुंगात सध्या कोणालाही त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी नाही. आणि सर्व अंडरट्रायल्सना त्यांच्या कुटुंबियांशी आठवड्यातून एक किंवा दोनदा व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्याची परवानगी आहे. या अंतर्गत आर्यन खानला त्याचे वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान यांच्याशी बोलण्याची परवानगी देण्यात आली. याशिवाय शाहरुख खानने आर्यनसाठी साडेचार हजार रुपयांची मनीऑर्डरही पाठवली आहे, जी त्याला सोमवारी मिळाली. या पैशातून आर्यन कॅन्टीनमधून जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतो.

आर्यन २० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात असेल

Aryan Khan, NCB

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी गुरुवारी आर्यनच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला. अमली पदार्थप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय २० ऑक्टोबरला देणार आहे.