सलमान खान सारखा जोडीदार अर्शी खानला हवा; सलमानच...

सलमान खान सारखा जोडीदार अर्शी खानला हवा; सलमानचा मात्र वेगळाच सूर… (Arshi Khan Wants To Date Salman Khan : His Reaction)

‘बिग बॉसच्या ११’ व्या पर्वाची स्पर्धक आणि ‘बिग बॉस १४’ मध्येही चॅलेंजर म्हणून दिसलेली कॉन्ट्रोवर्सी क्वीन अर्शी खान नेहमीच आपलं वक्तव्य आणि हरकतींमुळे चर्चिली जाते. ‘बिग बॉस १४’ मध्ये येऊन गेल्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे आणि ती सोशल मीडियावरही अधिक सक्रीय राहू लागली आहे. सध्या आपला जोडीदार कसा असावा याबाबत अर्शी खानने जे वक्तव्य केलं आहे, त्यामुळे ती चर्चेत आली आहे.  

अर्शीला हवाय सलमान खानसारखा जोडीदार

खरं म्हणजे लवकरच अर्शी खान टेलिव्हीजनवर स्वयंवर रचताना दिसणार आहे. याच अनुषंगाने तिने आपला जोडीदार कसा असावा हे सांगितले आहे. अर्शी खानने आपल्या मुलाखतीमध्ये स्वतःचे नातेसंबंध आणि खाजगी आयुष्याबाबत मोकळेपणाने बोलताना असं म्हटलं होतं की, तिला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सारखा जोडीदार हवा आहे.

बॉयफ्रेंडसोबत अलिकडेच झालाय ब्रेकअप

‘बिग बॉस १४’ च्या कुटुंबात प्रवेश करण्यापूर्वी अर्शी खान एका बिझनेसमन बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि बिग बॉस शो दरम्यान त्याला मिस करत होती. अर्शी कामाच्या शोधात मुंबईला आली होती, त्यावेळेस तिला काम मिळवून देण्यास मदत करणाऱ्या या व्यक्तीसोबतच ती डेट करत होती, असं अर्शीनंच सांगितलं आहे. परंतु पुढे दोघांचं पटेनासं झालं आणि बिग बॉस १४ संपल्यानंतर अर्शीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला.

अर्शी आता नव्या जोडीदाराच्या शोधात

सध्या ब्रेकअपनंतर सिंगल असलेल्या अर्शीने नव्या जोडीदाराचा शोध करण्यास सुरुवात केली आहे. तिनं म्हटलंय, ‘आता मी सिंगल आहे आणि डब्लूडब्लूई रेसलर ट्रिपल एच वा सलमान खानसारख्या मुलाला डेट करू इच्छीते.’

सलमान खानची यावर प्रतिक्रिया…

अर्शीला आपल्यासारखा जोडीदार पाहिजे हे समजल्यावर दबंग खानची प्रतिक्रिया मजेशीर होती आणि या गोष्टीचा खुलासाही खुद्द अर्शी खाननेच दिला आहे. मी ही गोष्ट सलमान साहेबाना सांगितली, जी ऐकल्यानंतर त्यांनी ‘नाही, तू चांगली मुलगी नाही’ अशी प्रतिक्रिया दिली.

तरुण मुलं नकोत, अर्शी शोधतेय प्रौढ मुलगा

अर्शी खानला साधा आणि प्रौढ मुलगा जोडीदार म्हणून हवा आहे. ती म्हणते, ”मला थट्टा मस्करीमध्ये काहीही बोलून टाकणारी तरुण मुलं आवडत नाहीत. मी एका श्रीमंत आणि रुबाबदार बिझनेसमनला डेट करू इच्छीते.” तिच्या या वक्तव्यावर बरीच चर्चा होत आहे.

‘बिग बॉस १४’ हा शो अर्शीला बराच लाभदायक ठरला आहे. या शोने तिला प्रसिद्धी तर दिलीच शिवाय चांगले प्रोजेक्टही मिळवून दिले आहेत. अर्शीला एका स्वयंवर शोची देखील ऑफर आली आहे. हल्लीच तिने मुंबईत स्वतःचं नवीन घर विकत घेतलं आहे. त्यासाठी तिने सलमान खानचे आभार मानले होते.