हॉट दिसण्यासाठी अर्शी खानने केले होते हे कारनाम...

हॉट दिसण्यासाठी अर्शी खानने केले होते हे कारनामे (Arshi Khan Underwent Hip Surgery to Look Hot, Before This She did This Thing with Her Lips)

टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 11’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली अर्शी खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, सध्या ती एका खास कारणामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्शी खानने नुकतीच हॉट दिसण्यासाठी आपली हिप सर्जरी केली आहे. यापूर्वीही तिने सुंदर दिसण्यासाठी आपल्या ओठांची सर्जरी देखील केली आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहता हिप मोठे दिसण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत घेतल्याचे सांगितले जाते.

अर्शी खानने दुबईमध्ये आपली हिप सर्जरी केली, याचा खुलासा तिच्या जवळच्या सूत्राने एका मुलाखतीत केला आहे. असे म्हटले जात आहे की नुकतीच अर्शी दुबईला गेली होती, जिथे तिने शस्त्रक्रियेद्वारे आपले हिप मोठे केले. अर्शीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी तिच्या जवळच्या मैत्रिणींना हे चांगलेच ठाऊक आहे.

यापूर्वी अर्शीने कॉस्मेटिक सर्जरीबद्दल खुलेपणाने आपले मत मांडले होते. काही काळापूर्वी तिने एका मुलाखतीत लिप फिलर्सबद्दल चर्चा केली. ती म्हणाली होती की सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात गैर काय आहे आणि ही माझी वैयक्तिक बाब आहे. अभिनेत्रीच्या मते सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात तिला काही नुकसान दिसत नाही.

हिप सर्जरी आणि लिप फिलर्स करणार्‍या अर्शी खानचा वादांशी घट्ट संबंध आहे. अफगाणिस्तानात जन्मलेली अर्शी भोपाळमध्ये मोठी झाली, पण नंतर करीअर करण्यासाठी ती मुंबईत आली. अर्शीचे नाव सेक्स स्कँडलमध्येही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि गोव्यातील सेक्स स्कँडलमध्ये तिचे नाव समोर आले होते, परंतू यात आपल्याला जाणूनबुजून अडकवण्यात आल्याचा आरोप तिने केला.

अर्शी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्यानंतर प्रसिद्धीझोतात आली तेव्हा तिने स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ यांच्यावर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप केला. अर्शीच्या सांगितले की, एकदा मी राधे माँच्या बिझनेस पार्टनरला भेटले तेव्हा त्याने मला सेक्स रॅकेटमध्ये सामील होण्याची ऑफर दिली, जी अर्शीने नाकारली.

अशीच एकदा भोजपुरी चित्रपटांच्या निर्मात्याला कानाखाली मारल्यामुळे अर्शी खान चर्चेत आली होती.अर्शी खानने याबाबत सांगितले होते की, ती भोजपुरी चित्रपटांच्या निर्मात्याशी चित्रपटात काम करण्याबाबत बोलत होती, मात्र त्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ती चिडली आणि तिने त्याला जाहीरपणे थप्पड मारली.