अर्जुनने प्रेयसी मलायका अरोरासोबत शेअर केला पॅर...

अर्जुनने प्रेयसी मलायका अरोरासोबत शेअर केला पॅरिसमधील रोमॅण्टिक फोटो…यूजर्सने लग्न करण्याचा दिला सल्ला (Arjun Kapoor shares pictures with ladylove Malaika Arora from Paris, Users comment- Bhai, Shadi kar lo)

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांच्या रिलेशनच्या चर्चा नेहमीच होत असतात. दोघेही खुलेआम त्यांच्या नात्याचे प्रदर्शन करत हातात हात घालून फिरतात. सोशल मीडियावर सुद्धा ते दोघे एकमेकांचे फोटो शेअर करतात.

अर्जुन आणि मलायका सध्या पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दोघेही अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसला गेले आहेत. आज २६ जूनला अर्जून आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

अर्जुन मलायकावरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. आता पॅरिसला जाऊन अर्जुनने मलायकासोबतचे रोमॅण्टिक फोटो शेअर  केले आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळावर या दोघांचे हातात हात घालून पॅरिसला रवाना होतानाचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हा पासून त्यांच्या चाहत्यांना त्यांचे पॅरिसमधील फोटो पाहण्याची उत्सुकता लागली होती. आता अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पॅरिसमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मलायका आणि अर्जुन कॅमेऱ्यात पाहून रोमॅण्टिक पोज देत असताना त्यांच्या पाठी आयफिल टॉवर दिसतो. फोटोत मलायका पांढऱ्या बाथरोबमध्ये पोज देत आहे तर अर्जुन सेल्फी काढत आहे.

दोघांच्या या फोटोवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींसह त्यांच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. कमेंटमध्ये एका यूजरने लिहिले की, मजा करा, दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना कोणीच अडवू शकत नाही. तर काहींनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या युजरने खूप सुंदर कपल अशी कमेंट केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन कपूर यावर्षी एकदम साधेपणाने त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानंतर लगेच तो त्याच्या पुढील कामात व्यस्त होईल. पुढे कामातून वेळ मिळणार नाही म्हणून त्याने आताच त्याची प्रेयसी मलायकासोबत हा पॅरिसमधला प्लॅन केला.