मलायका अरोरा सोबत ब्रेकअप? च्या अफवेवर अर्जुन क...

मलायका अरोरा सोबत ब्रेकअप? च्या अफवेवर अर्जुन कपूरने केला खुलासा (Arjun Kapoor Breaks Silence On His Breakup Rumours With Malaika Arora)

काल दिवसभर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातमीस उत आला होता. एका मीडिया हाऊसने आपल्या बातमीमध्ये अर्जुन आणि मलायका यांच्यातील चार वर्षांचं नातं संपलं असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर दोघंही ट्वीटरवर ट्रेंड होऊ लागले होते. दिवसभर दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने धुमाकुळ घातला होता. परंतु, संध्याकाळी उशिरा अर्जुन कपूरने मलायकासोबतचा मिरर सेल्फी शेअर करत सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

दिवसभर अर्जनु आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या वार्तेवर प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे तर्क-वितर्क लावत होते. हे सर्व सुरू असताना अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना त्याने मलायकाचा आणि त्याचा फोटो ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अर्जुनने लिहिले आहे की, ‘आमच्या नात्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना स्थान नाही. सुरक्षित रहा, काळजी घ्या. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो…आणि तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम…’

अर्जुनच्या या पोस्टवर मलायकाने हार्टचा इमोजी शेअर करून हेच सत्य असल्याची हमी दिली आहे. अर्जुनच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीजनी या प्रेमीयुगलासाठी प्रेम व्यक्त केलं आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका कपूर हे गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसतात, एकत्र सुट्ट्यांवर जातात. बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कायम एकत्र असणारे हे कपल गेल्या आठ दिवसांपासून एकदाही एकत्र दिसले नाही. अर्जुनपासून दुरावली गेल्यामुळे मलायका प्रचंड दुःखात असून आठ दिवस तिने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे, अशाही बातम्या ही प्रसिद्ध झाल्या. इतकेच नाही तर मलायकाच्या घराशेजारी राहत असलेल्या त्याच्या बहिणीकडे रिया कपूरकडे अर्जुन डिनरसाठी गेला होता. नेहमी त्याच्यासोबत तेथे जाणारी मलायका आली नाही, शिवाय तिथे जाऊन सुद्धा तो मलायकाच्या घरी तिला भेटायला गेला नाही. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं असल्याच्या अफवांना मोकळं रानच मिळालं.

परंतु आता अर्जुनने पोस्ट करत त्यांच्यात सारे काही आलबेल असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तरी या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अन्‌ दोघांच्या चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.