अर्जुन बिजलानी ठरला ‘खतरों के खिलाड़ी ११’ चा वि...

अर्जुन बिजलानी ठरला ‘खतरों के खिलाड़ी ११’ चा विजेता, पत्नी नेहाने शेअर केला ट्रॉफीचा फोटो (Arjun Bijlani Wins The Title of ‘Khatron Ke Khiladi 11’, Wife Neha shares Picture of The Trophy)

बॉलिवूडचा चित्रपट निर्माता रोहित शेट्टी होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ चा प्रीमियर १७ जुलै रोजी झाला आणि आता या आठवड्याच्या शेवटी शोचा ग्रँड फिनाले प्रसारीत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये काही महिन्यांपूर्वी स्टंटवर आधारित या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण करण्यात आले होते, त्यातील टॉप ५ फायनलिस्टसह ग्रँड फिनालेचा एपिसोड मंगळवारी (२१ सप्टेंबर) शूट करण्यात आला. तथापि, टेलिव्हिजनवर शेवटचा भाग प्रसारित होण्याआधीच, सोशल मीडियावर विजेत्याचे नाव जाहीर केले गेले आहे. एवढेच नव्हे तर ‘खतरों के खिलाडी ११’ जिंकल्याबद्दल सोशल मीडियावर अर्जुन बिजलानीचे अभिनंदन केले जात आहे. अर्जुनची पत्नी नेहा स्वामी बिजलानीने ‘केकेके ११’ च्या ट्रॉफीचे छायाचित्र शेअर करून या बातमीस पुष्टी दिली आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

Arjun Bijlani Wins, Khatron Ke Khiladi 11

पती अर्जुन बिजलानीच्या विजयी ट्रॉफीचा फोटो शेअर करण्याबरोबरच नेहाने त्याच्यासाठी एक सुंदर पोस्ट लिहून तिला तिच्या पतीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. खरं तर, अर्जुन बिजलानीने ‘खतरों के खिलाडी ११’ जिंकल्याच्या अफवांना पूर्णविराम देत नेहा स्वामी बिजलानीने तिच्या पतीला मिळालेल्या विजेत्या ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे, ट्रॉफी सिंहाच्या आकारात असून ट्रॉफीच्या मागील बाजूस एक ध्वज आहे, ज्यावर लिहिले आहे – फियर बनाम डेअर आणि यासह ट्रॉफीवर सीझन ११ असेही लिहिलेले आहे.

Arjun Bijlani Wins, Khatron Ke Khiladi 11

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

दुसऱ्या पोस्टमध्ये नेहा बिजलानीने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिली आहे – मला तुझा खूप अभिमान आहे … मला माहित आहे की, तू खरोखर काय केले आहे. जगातील सर्व आनंद तुला मिळावयास हवा… फोटोमध्ये हे जोडपे काळ्या आणि पांढऱ्या पोशाखात एकमेकांना पूरक दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे.

Arjun Bijlani Wins, Khatron Ke Khiladi 11

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अर्जुन बिजलानी ‘खतरों के खिलाडी ११’ चा विजेता ठरला आहे, तर धाकड गर्ल दिव्यांका त्रिपाठी ही फर्स्ट रनर अप बनली आहे. वास्तविक, दिव्यांका त्रिपाठी आणि अर्जुन बिजलानी पहिल्या २ मध्ये होते, ग्रँड फिनालेमध्ये दोघांमध्ये जबरदस्त लढत झाली आणि शेवटी अर्जुनने दिव्यांकाला हरवून ट्रॉफी जिंकली. वीकेंडला शेवटचा भाग प्रसारित होईल तेव्हा या बातमीस अधिकृतपणे पुष्टी दिली जाईलच. परंतु यापूर्वीच सोशल मीडियावरील चाहत्यांनी अर्जुन बिजलानीला विजयाबद्दल अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

Arjun Bijlani Wins, Khatron Ke Khiladi 11

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

गंमत म्हणजे खतरों के खिलाडीच्या ११ व्या पर्वाच्या प्रिमियरच्या आधीच राखी सावंतने जूनमध्येच पॅपराजींशी बोलताना अर्जुन बिजलानी या शोचा विजेता आहे, असे सांगितले होते. या रिॲलिटी शोचे केप टाऊनमधील शुटिंग संपल्यानंतर सर्व स्पर्धक मुंबईत परतले असतानाच राखीने या शोच्या विजेत्याच्या नावाचा खुलासा केला होता.