अर्जुन बिजलानीने मुलासाठी धूम्रपान न करण्याचा घ...

अर्जुन बिजलानीने मुलासाठी धूम्रपान न करण्याचा घेतला निर्णय, म्हणाला सोपं नाहीय, पण प्रयत्न करतोय (Arjun Bijlani quits smoking for son, Says- It is not easy but I am trying my best)

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता, होस्ट अर्जुन बिजलानीची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो, ज्यावर त्याचे चाहते खूप प्रेम करतात. विशेषत: अर्जुनचा मुलगा आणि पत्नीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या चाहत्यांची मने जिंकतात. आता पुन्हा एकदा अर्जुन बिजलानीने आपल्या कुटुंबासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्याचे चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे. अर्जुनने आपल्या मुलासाठी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जुन बिजलानीने नवीन वर्ष २०२३ साठी मोठा संकल्प घेतला आहे. या नवीन वर्षात अर्जुन बिजलानीने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनच्या या निर्णयामुळे केवळ त्याचे कुटुंबीयच नाही तर चाहतेही खूश आहेत.

अर्जुनने नवीन वर्षाच्या ४ दिवसांनंतरच ट्विटरवर माहिती दिली होती की, नवीन वर्षात सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले, “मी ४ दिवसांपासून धूम्रपान केलेले नाही. नवीन वर्षाचा संकल्प परिणामकारक आहे.. आणि प्रामाणिकपणे ते चांगले वाटते…”

आता अर्जुनने एका मुलाखतीत याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे आणि त्याने धूम्रपान सोडण्याचा निर्णय का घेतला आहे हे सांगितले आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “मी माझ्या मुलासाठी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मी त्याच्यासमोर एक चांगला आदर्श ठेवू शकेन.” अभिनेता पुढे म्हणाला, “हे सोपे नाही, पण मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. मी एका आठवड्यापासून धूम्रपान केले नाही, जरी मी यासाठी पॅच वापरत आहे, तरी मला आता बरे वाटते. मला बऱ्याच दिवसांपासून धूम्रपान सोडायचे होते, शेवटी या वर्षी मी हा संकल्प केलाच.

एवढेच नाही तर अर्जुन बिजलानीने ड्रिंक्स सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र, त्याने हे त्याच्या वार्षिक डिटॉक्स योजनेअंतर्गत केले आहे. तो म्हणाला, “खरं तर मी खूप मद्यपान करणाऱ्यांपैकी अजिबात नाही. मी अधूनमधून पितो, पण वर्षातील तीन ते चार महिने मी पीत नाही. मी दरवर्षी हे डिटॉक्स करतो.”

अर्जुनने धूम्रपान सोडताना येणाऱ्या अडचणींबद्दलही सांगितले. तो म्हणाला, जेव्हा जेव्हा मला धूम्रपान करावेसे वाटते तेव्हा मी स्वतःला दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते की मी २८ दिवसांचा टप्पा पार केला तर मी धूम्रपान सोडू शकेन. माझ्यासाठी या वर्षाची ही सर्वात आरोग्यदायी सुरुवात आहे. अर्जुनने सोशल मीडियावर धूम्रपान सोडण्याचा निर्णय का शेअर केला हे देखील स्पष्ट केले, “माझ्या या संकल्पाने इतरांना प्रेरणा मिळाली तर काय चांगले होईल.” असे तो म्हणाला.

अर्जुनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन बिजलानीने टीव्ही शो ‘कार्तिक’ मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती, पण ‘मिले जब हम तुम’ या शोमधून त्याला लोकप्रियता मिळाली. यानंतर अर्जुन टीव्हीच्या प्रसिद्ध शो ‘नागिन’चाही भाग होता. आता अर्जुन अवॉर्ड शो आणि रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसत आहे.