दीपिका व्यतिरिक्त या व्यक्तीने केलयं रणवीर सिंह...

दीपिका व्यतिरिक्त या व्यक्तीने केलयं रणवीर सिंहच्या मनात घर, अभिनेत्याने दिले मजेशीर उत्तर (Apart From Deepika, For Whom Does Ranveer Singh’s Heart Beats, The Actor Gave A Funny Answer)

बॉलिवूडच्या क्यूट कपलच्या यादीत समाविष्ट असलेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाला 4 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण अजूनही दोघांमधील जबरदस्त बाँडिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. या जोडप्याने 14 नोव्हेंबर 2018 ला इटलीमध्ये थाटामाटात लग्न केले. दीपिका आणि रणवीरची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाल्याचे बोलले जाते. नुकतेच रणवीरने एका मुलाखतीदरम्यान, 2012 मध्ये दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले होते. दरम्यान, अभिनेत्याने दीपिकाशिवाय आणखी एका व्यक्तीने त्याच्या मनात घर केल्याचे सांगितले.  

सध्या रणवीर सिंह आपल्या ‘सर्कस’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या स्टारकास्टची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. रणवीर टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असतो. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत रणवीरने दीपिका पादुकोण व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जिला पाहिल्यावर त्याला करंट लागतो असे सांगितले.

मुलाखतीदरम्यान रणवीर सिंहला विचारण्यात आले की, दीपिका पादुकोणशिवाय तुला विजेचा करंट देणारी व्यक्ती कोण आहे? तर या प्रश्नाचे मस्त उत्तर देताना रणवीर म्हणाला, दीपिकाला पाहून करंट जाणवतो आणि बर्‍याचदा जेव्हा मी आरशासमोर जातो तेव्हा कधी कधी वाटतं, वाह, मी काय दिसत आहे.

‘रामलीला’ चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणची नावं फायनल झाल्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दोघांनाही आपल्या घरी जेवणासाठी बोलावलं. जेवण करत असताना दीपिकाच्या दातांमध्ये अन्न अडकले, त्यानंतर रणवीरने हातवारे करून दीपिकाला सांगितले की तुझ्या दातांमध्ये काहीतरी अडकले आहे. यावर दीपिका मोठ्या प्रेमाने म्हणाली की, तू ते काढून दे. म्हणजे काय, इथूनच दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. दोघेही या भेटीला आजही आपली पहिली डेट मानतात.

रणवीर सिंहच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटाव्यतिरिक्त तो लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पुन्हा एकदा आलिया भट्ट दिसणार आहे. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.