भारती सिंग कॉमेडी व्यतिरिक्तही करते साईड बिझनेस...

भारती सिंग कॉमेडी व्यतिरिक्तही करते साईड बिझनेस (Apart From Comedy , Bharti Singh Also Does This Side Business, You Will Be Stunned To Know)

भारताची सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीतील स्थान पक्के केले आहे. एकेकाळी अत्यंत गरीबीत दिवस काढणारे भारती सिंगचे कुटुंब आजच्या काळात अतिशय आलिशान जीवन जगत आहे. भारती अनेक कॉमेडी आणि रिअॅलिटी शोमध्ये काम करते. पण ती टीव्ही शो व्यतिरिक्त स्वतःचा साईड बिझनेस देखील चालवते आणि त्या बिझनेसमधून भरपूर कमाई देखील करते हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.

भारती सिंग युट्यूबवर स्वत:चे ब्लॉग टाकत असते. अशाच एका ब्लॉगमध्ये तिने आपल्या साईड बिझनेसचा उल्लेख केला होता. त्या ब्लॉगमार्फत तो सर्व जगासमोर आला. भारतीची स्वत:ची वॉटर फॅक्टरी आहे. तिचा हा कारखाना पंजाबमध्ये आहे. अमृतसरच्या बाहेरील एका मोकळ्या जागेत तिने मिनरल वॉटरचा कारखाना बांधला आहे. तसेच तिथे तिने एक रिसॉर्टसुद्धा बांधले आहे. भारतीने हा कारखाना चार-पाच वर्षांपूर्वी सुरू केला होता. तिच्या मिनरल वॉटर ब्रँडचे नाव KELEBY आहे. या कारखान्यात आजूबाजूच्या गावातील लोक काम करतात. त्यांच्या रोजगारासाठी आपला हातभार लागतो यासाठी भारती खूप खुश असल्याचे सांगते.

भारती सिंहचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला. काही दिवसांपूर्वी ती तब्बल ४ वर्षांनी अमृतसरला गेली होती. भारतीची आई खूप आजारी होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं त्यासाठी ती अमृतसरला गेली होती. यावेळी पहिल्यांदाच तिने आपली फॅक्टरी लोकांना दाखवली आणि आपल्या आणखी एका व्यवसायाची लोकांना ओळख करून दिली. एवढंच नाही तर भारतीला रिक्षासुद्धा उत्तम चालवता येते याची झलक तिने आपल्या ब्लॉगमध्ये दाखवली.

 भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचे एक यूट्यूब चॅनल आहे, त्यातून ते भरपूर कमाई करतात. इतकंच नाही तर भारती ब्रँड एंडोर्समेंट आणि इंस्टाग्राममधूनही भरपूर कमाई करते. 2019 मध्ये भारती सिंगचे नाव फोर्ब्सच्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. त्या यादीत भारती ८२व्या क्रमांकावर होती. त्यावेळी तिची कमाई 10.92 कोटी होती.

भारती सिंगने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. आजच्या काळात भारती सिंग रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी प्रति एपिसोड 5 लाख रुपये घेते.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम