अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शकही आहेत हे कलाकार ...

अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शकही आहेत हे कलाकार (Apart From Being An Actor, These Bollywood Stars Are Also Directors)

अजय देवगणपासून ते कंगना रणावतपर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत जे केवळ उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रीच नाहीत तर त्यांनी स्वतःला चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही सिद्ध केले आहे. असं म्हटलं जातं की तुमच्यात कौशल्य आणि एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. असंच काहीसं बॉलिवूडच्या या सुपर यशस्वी स्टार्सनी केलं आहे.

अजय देवगण

 अभिनयाच्या बाबतीत अभिनेता अजय देवगणने एकापेक्षा एक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेषत: त्याचे अॅक्शन चित्रपट चाहत्यांना खूप आवडतात. अजय देवगणचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण अजय देवगण केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर तो एक चांगला दिग्दर्शक देखील आहे. अजय देवगणने ‘यू मी और हम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कंगना रणावत

 बॉलिवूडच्या सर्वात टॅलेन्टेड अभिनेत्रींच्या यादीत कंगना रणावतच्या नावाचा समावेश होतो. कोणताही चित्रपट सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी ती आपले पूर्ण योगदान देते आणि कठोर परिश्रम करते, तिची मेहनत तिच्या चित्रपटांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. पण अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगली दिग्दर्शक देखील आहे कंगनाने तिचा सुपरहिट चित्रपट ‘द क्वीन ऑफ झांसी’ दिग्दर्शित केला होता.

सनी देओल

 बॉलिवूडच्या सर्वात शक्तिशाली अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट असलेला सनी देओल भलेही लाजाळू स्वभावाचा असला, तरीही अभिनयात तो जबरदस्त आहे. प्रत्येक पात्राला जीवंत करणारा सनी देओल अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे. ‘घायल: वन्स अगेन’ हा चित्रपट सनी देओलने दिग्दर्शित केला होता.

हेमा मालिनी

 ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी प्रत्येक बाबतीत परफेक्ट आहे. ती दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच हुशार आहे. दिग्गज अभिनेत्री असण्यासोबतच तिने स्वतःला दिग्दर्शक म्हणूनही सिद्ध केले आहे. ‘ऐ दिल है आशना’ चित्रपटाचे दिग्दर्शन हेमा मालिनी यांनी केले होते.

अनुपम खेर

 बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही स्वत:ला सिद्ध केले आहे. ‘ओम जय जगदीश’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनुपम खेर यांनी केले होते.